मुंबई, 02, जून: महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result 2023) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. . त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. नक्की कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे हे बघूया. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. त्यानुसार आता बारावीतही कोकण विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. 10च्या निकालातही कोकण विभागाचा निकाल 98.11 % तब्बलटक्के लागला आहे.
Maharashtra SSC Result 2023: मोठी बातमी! अखेर दहावीचा निकाल जाहीर; इतके टक्के लागला रिझल्ट; जाणून घ्या वैशिष्ट्येसर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. इतर विभागांचे निकाल पुढील प्रमाणे आहेत. विभागनिहाय निकालाची टक्केवारी
विभाग | निकाल 2023 | निकाल 2022 |
---|---|---|
पुणे | 95.64 टक्के | 96.96 टक्के |
नागपूर | 92.05 टक्के | 97.00 टक्के |
कोकण | 98.11 टक्के | 99.27 टक्के |
मुंबई | 93.63 टक्के | 96.94 टक्के |
कोल्हापूर | 96.73 टक्के | 98.50 टक्के |
अमरावती | 92.22 टक्के | 96.81 टक्के |
नाशिक | 92.22 टक्के | 95.90 टक्के |
छ. संभाजी नगर | 93.23 टक्के | 96.33 टक्के |
लातूर | 92.67 टक्के | 97.27 टक्के |
Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा निकालाची काही वैशिट्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल … टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. गेल्यावर्षी 10 वी निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा माञ तोच निकाल 93.83 टक्के इतका लागलाय… म्हणजे 3 टक्के कमी सन 2023 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2022 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे. 12वी विसरा; दहावीनंतरच्या ‘या’ भन्नाट डिप्लोमा कोर्सेसबद्दल ऐकलंय का? लाखो रुपये मिळेल सॅलरी किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही दहावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान ऑनलाईन जाहीर होणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येणार आहे. असा होता गेल्या वर्षीचा निकाल सन 2022 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2021 च्या निकालाच्या तुलनेत कमी होता. गेल्या वर्षी दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला होता. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा होता. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 होता. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40% लागला होता. एकूण 66 विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100% टक्के लागला होता. राज्यातील शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल 100 % लागला होता. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 54,303 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 79.06% आहे.