100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चक्क शिक्षणाचं माहेरघर मागे पडलं आहे.
मुंबई, 02, जून: महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result 2023) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. . त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे निकाल काही प्रमाणात कमी लागला होता. मात्र महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2023 चा निकाल हा 93.83 टक्के लागला आहे. मात्र यंदाच्या निकालामध्ये 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चक्क शिक्षणाचं माहेरघर मागे पडलं आहे.
महाराष्ट्राच्या दहावीच्या निकालात राज्यात 100 टक्के मार्क मिळालेले एकूण 151 विद्यार्थी आहेत. मात्र यात ना पुणे ना मुंबई तर अव्वल ठरलाय तो लातूर विभाग. कारण लातूर विभागात तब्बल 108 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत. तर राज्यातील कुठलाही विभाग याच्या जवळपास सुद्धा नाही. Maharashtra SSC Result 2023: मोठी बातमी! अखेर दहावीचा निकाल जाहीर; इतके टक्के लागला रिझल्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये विभागनिहाय निकालाची टक्केवारी
विभाग | निकाल 2023 | निकाल 2022 |
---|---|---|
पुणे | 95.64 टक्के | 96.96 टक्के |
नागपूर | 92.05 टक्के | 97.00 टक्के |
कोकण | 98.11 टक्के | 99.27 टक्के |
मुंबई | 93.63 टक्के | 96.94 टक्के |
कोल्हापूर | 96.73 टक्के | 98.50 टक्के |
अमरावती | 92.22 टक्के | 96.81 टक्के |
नाशिक | 92.22 टक्के | 95.90 टक्के |
छ. संभाजी नगर | 93.23 टक्के | 96.33 टक्के |
लातूर | 92.67 टक्के | 97.27 टक्के |
निकालाची काही वैशिट्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल … टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे. गेल्यावर्षी 10 वी निकाल 96.94 टक्के इतका होता यंदा माञ तोच निकाल 93.83 टक्के इतका लागलाय… म्हणजे 3 टक्के कमी सन 2023 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2022 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे. Maharashtra SSC Result 2023 Live updates: थोड्याच वेळात निकाल, न्यूज18 लोकमतवर सर्वात आधी पाहा कोणत्या विभागात किती विद्यार्थ्यांना 100% पुणे: 5 औरंगाबाद: 22 मुंबई: 06 अमरावती: 07 लातूर: 108 कोकण: 3 असा चेक करा तुमचा निकाल सुरुवातीला https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा. यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.