JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra Police Bharti: शारीरिक क्षमता तर दाखवलीत; आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

Maharashtra Police Bharti: शारीरिक क्षमता तर दाखवलीत; आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

आता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण या लेखी परीक्षेचं स्वरूप नक्की असेल तरी कसं ? आणि कोणते उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील हे जाणून घेणार आहोत.

जाहिरात

आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी: महाराष्ट्रातील तरुणांसाठी सर्वात मोठी खुशखबर असणारी महाराष्ट्र पोलीस भरती ची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन 02 जानेवारी 2023 पासून शहरीक परीक्षा घेण्यात आली होती. यंदा आधी शारीरिक परीक्षा घेण्यात आली आहे तर यानंतर आता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण या लेखी परीक्षेचं स्वरूप नक्की असेल तरी कसं ? आणि कोणते उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. Success Story: वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही नव्हते पैसे; केला बांगड्यांचा व्यवसाय; तरीही जिद्दीनं झाले IAS असं असेल लेखी परीक्षेचं पॅटर्न 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील. सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.

विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणएकूण वेळ 
गणित25 प्रश्न25 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

चालक पदांसाठी अशी होईल चाचणी हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची असेल आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या