मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही नव्हते पैसे; केला बांगड्यांचा व्यवसाय; तरीही जिद्दीनं झाले IAS

Success Story: वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही नव्हते पैसे; केला बांगड्यांचा व्यवसाय; तरीही जिद्दीनं झाले IAS

IAS रमेश घोलप यांची संघर्षगाथा

IAS रमेश घोलप यांची संघर्षगाथा

आपल्या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी UPSCची तयारी केली आणि त्यात यशही मिळविले.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी:  देशातील सर्वांत प्रतिष्ठित सरकारी पदांपैकी एक म्हणजे आयएएस होय. देशातील लाखो तरुणांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. त्यापैकी फारच कमी लोक त्यांचं हे स्वप्न पूर्ण करू शकतात. पण काही अधिकाऱ्यांच्या आयएएस होण्यामागील कथा, त्यांची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी असते. त्यांचा प्रवास वाचल्यावर अशा अधिकाऱ्यांना एक कडक सॅल्यूट ठोकावंसं वाटतं. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचीही कहाणी अशीच आहे. आपल्या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी UPSCची तयारी केली आणि त्यात यशही मिळविले. जर तुमचं ध्येय ठरलं असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही, असं रमेश घोलप यांची यशोगाथा सांगते.

आयएएस अधिकारी रमेश घोलप यांना लहानपणी पोलिओची लागण झाली होती आणि लहानपणीच त्यांना डाव्या पायाला अर्धांगवायू झाला होता. आर्थिक विवंचनेमुळे त्यांना आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकाव्या लागत होत्या. पण त्यांनी आपल्या स्वप्नाशी तडजोड केली नाही. शेवटी त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि ते आयएएस अधिकारी झाले.

सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा

आईबरोबर विकल्या बांगड्या

आयएएस रमेश घोलप यांच्या वडिलांचं सायकल दुरुस्तीचं छोटसं दुकान होतं. वडिलांच्या दारुच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर आलं. एके दिवशी त्यांच्या वडिलांना जास्त दारू प्यायल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर कुटुंबाचा संपूर्ण भार त्याची आई आणि त्यांच्या खांद्यावर पडला. त्या कठीण काळात त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी आईसोबत रस्त्यावर बांगड्या विकल्या होत्या.

NOKIA कंपनी मुबंईत करणार या पदांसाठी भरती; ऑनलाईन पद्धतीनं लगेच करा अप्लाय

वडिलांच्या अंत्यसंस्काराला जायला नव्हते पैसे

आयएएस रमेश घोलप यांनी सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या गावातून पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आपल्या मामाच्या घरी गेले. वडिलांचे निधन झाले तेव्हा रमेश बारावीत शिकत होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. मामाच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंत जाण्याचं भाडं फक्त 7 रुपये होतं. त्यातही अपंग असल्यामुळे रमेशचं भाडं फक्त दोन रुपये होतं, पण त्यावेळी त्यांच्याकडे दोन रुपयेही नव्हते.

ही सुवर्णसंधी सोडू नका; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक; रेल्वेत 10वी पाससाठी बंपर भरती

गावच्या शाळेत बनले शिक्षक

बारावीनंतर रमेश घोलप यांनी डिप्लोमा केला आणि गावातील शाळेत शिक्षक झाले. मात्र, त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि बी.ए.ची पदवी पूर्ण केली. पण यूपीएससीच्या तयारीसाठी सहा महिने नोकरी सोडावी लागली. त्यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र ते नापास झाले. त्यानंतर त्यांच्या आईने गावकऱ्यांकडून काही पैसे उसने घेऊन त्यांना पुण्याला शिक्षणासाठी पाठवलं.

कोचिंगशिवाय झाले आयएएस

रमेश घोलप यांनी पुण्यात जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम आणि मेहनतीनंतर अखेर 2012 मध्ये त्यांना यश मिळालं. त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. देशभरात 287 रँक मिळवून ते अपंग कोट्याअंतर्गत आयएएस अधिकारी बनले. त्यांचा संघर्ष खूपच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Ias officer, Job alert, Success stories