पुणे, 29 जुलै : महाराष्ट्र बोर्डाचा (MSBSHSE SSC Result) दहावीचा निकाल (SSC Result 2020) थोड्याच वेळात ऑनलाईन दिसणार आहे. अजून काही मिनिटातच तो बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in इथे दिसू लागेल. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना तो पाहता येणार आहे. News18lokmat च्या वेबसाईटवरही दुपारी 1 नंतर निकाल पाहता येईल. दहावीचा निकाल कधी लागणार याकडे राज्यभरातल्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष होतं. News18 वर कसा पाहायचा निकाल निकाल जाहीर झाल्यानंतर तो न्यूज 18 लोकमतवरही पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
यंदा कोकण बोर्डाचा दरवर्षीप्रमाणे निकाल सर्वाधिक लागला आहे. तर औरंगाबाद बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी निकालही यंदा 90 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती शकुंतला काळे यांनी दिली आहे. दुपारी 1 वाजता दहावीच्या बोर्डाचा निकाल News 18 Lokmat वरही पाहू शकणार आहात. MSBSHSE SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, गुणपडताळणीसाठी इथे कराल ऑनलाइन अर्ज 3 मार्च 2020 ते 23 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल 95 .39 इतका लागला आहे. या वेबसाईट्स महत्त्वाच्या बोर्डाचा अधिकृत निकाल खालील वेबसाईटवर 1 वाजल्यानंतर पाहता येईल. mahahsscboard.maharashtra.gov.in www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in www.news18lokmat.com SMS द्वारेही कळे निकाल आपण बोर्डाकडे रजिस्टर केलेल्या मोबाईलनंबरवरून आपला निकाल SMS द्वारे पाहू शकणार आहात.