दुपारी 1 ऐवजी इतके वाजता लागणार रिझल्ट
मुंबई, 24 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे. निकालाची तारीख बोर्डाकडून जारी करण्यात आली आहे. स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल हा उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या पोटात गोळा आला आहे. मात्र यंदा निकालाच्या वेळेत मात्र बदल करण्यात आला आहे. ऑनलाईन जाहीर होणाऱ्या या निकालाची वेळ मात्र थोडीशी बदलण्यात आली आहे. MH State Board 12th Result: विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! उद्याच जाहीर होणार 12वीचा निकाल किती वाजता जाहीर होणार निकाल दरवर्षी प्रमाणे यंदाही बारावी बोर्डाचे निकाल हे सुमारे दुपारी एक वाजताच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र निकाल हा एक तास उशिरा म्हणजे दोन वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. हे सर्व निकाल ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि त्यांच्या आईचं नाव देऊन आपला निकाल बघता येईल अशी माहिती सुत्रांकडू मिळाली आहे. MH State Board 12th Result: फक्त News18 Lokmat वर दिसेल सर्वात वेगवान निकाल; इथे करा रजिस्टर News 18 लोकमतच्या वेबसाईटवर असा थेट बघा निकाल बारावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC result) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. विशेष म्हणजे हा निकाल तुम्ही News 18 लोकमतच्या ऑफिशिअल वेबसाईटवर थेट बघू शकणार आहात. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे.
अशा पद्धतीनं करा रजिस्ट्रेशन यासाठी आधी https://lokmat.news18.com/career/ या लिंकवर जा. यानंतर बोर्डाच्या निकालाची कोणतीही बातमी उघडा. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी विंडो दिसेल. इथे तुमचा क्लास म्हणजे दहावी किंवा बारावी सिलेक्ट करा. यानंतर तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भर. यानंतर Register या बटनेवर क्लिक करा. अशा पद्धतीनं नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला निकालासंदर्भात ऑडिट येईल. यानंतर तुम्हाला निकाल जाहीर झाल्या झाल्या लिंक ओपन करून निकाल बघता येईल. निकाल बघून तुमचा निकाल सेव्हही करता येईल.