JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ऑन रोल आणि ऑफ रोल जॉब म्हणजे नक्की काय? कंपनीत तुम्ही कोणत्या जॉबवर आहात? असा ओळखा फरक

ऑन रोल आणि ऑफ रोल जॉब म्हणजे नक्की काय? कंपनीत तुम्ही कोणत्या जॉबवर आहात? असा ओळखा फरक

आज आम्ही तुम्हाला ऑन रोल आणि ऑफ रोल जॉबमधील फरक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा जॉब कोणता आहे ते ओळखू शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

असा ओळखा फरक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 सप्टेंबर: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच जणांना कॅम्पस मुलाखतींमध्ये जॉब मिळतो तर काही लोकांना यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. एकदा कंपनीत जॉईन होताना तुम्हाला तुमचा जॉब कोणत्या प्रकारचा असेल काम काय असेल याबद्दल माहिती दिली जाते. मात्र तुम्ही कंपनीच्या ऑन रोल आहात की ऑफ रोल याबद्दल माहिती दिली जात नाही. यामुळे तुम्हाला बऱ्याच सुविधा मिळतात मिळत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑन रोल आणि ऑफ रोल जॉबमधील फरक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमचा जॉब कोणता आहे ते ओळखू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. आजकाल जॉब मार्केटमध्ये दोन प्रकारच्या नोकऱ्या प्रचलित आहेत - ऑन रोल जॉब आणि ऑफ रोल जॉब. ज्या कंपनीत कर्मचारी काम करतात आणि त्यांना त्याच कंपनीकडून पगार मिळतो त्याला ऑन रोल जॉब म्हणतात. त्याच वेळी काही कर्मचारी एखाद्या कंपनीसाठी काम करतात आणि त्यांना तृतीय पक्षाद्वारे पगार मिळतो, त्याला ऑफ रोल जॉब म्हणतात. MBA करायचं आहे? कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही, पाहा कसं घेऊ शकता शिक्षण ऑन रोल जॉब आणि ऑफ रोल जॉबमधील फरक जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत काम करतो आणि त्याच कंपनीत पगारावर असतो तेव्हा त्याला ऑन रोल जॉब म्हणतात. परंतु जेव्हा एखादा कर्मचारी थर्ड पार्टी कंपनीसाठी काम करतो आणि दुसऱ्या कंपनीच्या पगारावर असतो तेव्हा त्याला ऑफ रोल जॉब म्हणतात. ऑफ रोल जॉब अशा प्रकारे समजू शकतो की ज्या कंपनीत कर्मचारी काम करतो त्या कंपनीचा पगार त्याला दुसऱ्या कंपनीकडून दिला जातो, ज्याला आपण थर्ड पार्टी म्हणतो. असे होऊ शकते की तृतीय पक्ष तुम्हाला दुसर्‍या कंपनीत काम करायला लावतो आणि जेव्हा मूळ कंपनी त्या कामासाठी पैसे देते तेव्हा त्यातील काही भाग ठेवून Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; हेवा वाटेल असा YouTuber ऑन रोल जॉबमध्ये, मूळ कंपनी तिच्या सर्व कर्मचार्‍यांचा रेकॉर्ड ठेवते, तर ऑफ रोल जॉबमध्ये मूळ कंपनी तिच्या सर्व कर्मचार्‍यांचा रेकॉर्ड ठेवते परंतु ती तृतीय पक्ष कंपनी नाही ज्यांना ती सेवा पुरवत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या