मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; तरुणाईला हेवा वाटेल असा YouTuber

Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; तरुणाईला हेवा वाटेल असा YouTuber

:रणवीर अलाहाबादीया'

:रणवीर अलाहाबादीया'

आज आपण अशाच एका युट्युबरबद्दल बोलणार आहोत जो फार कमी वयात लोकप्रिय आहे. तसंच आपल्या व्हिडीओमधून किंवा पॉडकास्टमधून तो तरुणांना नेहमीच इन्स्पायर करत असतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

आजकालची पिढी ही कोणाचं ऐकून किंवा कोणाच्या दबावाखाली न येता आपलं भविष्य स्वतः घडवण्याची ताकद ठेवते. म्हणूनच आता अनेकांना फार कमी वयात स्वतःच्या आवडीचं काम मिळायला लागलं आहे. त्यात काही लोक असेही असतात जे कमी वयात अनेकांची प्रेरणा बनतात. आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यात जर ती व्यक्ती कोणी युट्युबर असेल तर मग बघायलाच नको. आज आपण अशाच एका युट्युबरबद्दल बोलणार आहोत जो फार कमी वयात लोकप्रिय आहे. तसंच आपल्या व्हिडीओमधून किंवा पॉडकास्टमधून तो तरुणांना नेहमीच इन्स्पायर करत असतो.

जरा विचार करा तुम्ही कधी gym जाणाऱ्या फिटनेसबद्दल, लाइफस्टाइलबद्दल सांगणाऱ्या व्यक्तीला अध्यात्माबद्दलही तितकंच बोलताना ऐकलंय? नाही ना. पण असा एक युट्युबर आहे जो या दोनही गोष्टी तितक्याच सहजपणे करतो. हो आम्ही बोलत आहोत 'रणवीर अलाहाबादीया' याच्याबद्दल. अर्थात तुम्ही रणवीरला BeerBiceps म्हणून किंवा TRS या शोजच्या माध्यमातून ओळखत असाल. रणवीरला कोणी ओळखत नाही किंवा व्हिडीओ कोणी बघितले नाहीत असे लोकं सापडणार नाहीत. पण नक्की हा रणवीर अलाहाबादीया नक्की आहे तरी कोण? त्याच्या संपूर्ण YouTube जर्नीबद्दल आज आपण जाणून घेऊया.

रणवीरचा जन्म मुंबईतच झाला. त्यामुळे तो पक्का मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन आहे असं म्हणायला हरकत नाही. रणवीरचे आई-वडील दोघंही डॉक्टर असल्यामुळे त्याच्या घरी नेहमीच शांत वातावरण असायचं. साहजिकपणे आई-वडील डॉक्टर असल्यामुळे रणवीरही डॉक्टरच होणार असं लोकांना वाटायचं. पण रणवीरच्या मनात काही वेगळंच होतं.

रणवीरना इंजीनिअरिंगला प्रवेश घेतला खरा पण तिथे त्याचं मन नव्हतं. आपणही सतत जगाच्या वेगळं दाखवावं अशी रणवीरची सतत इच्छा होती. अशातच वडिलांनी त्याला एक व्हिडीओ कॅमेरा आणून दिला आणि इथून सुरु झाला रणवीरचा युट्युबचा प्रवास.

कॅमेरा आणून दिल्यानंतर रणवीरने स्वतःच व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी शिकली. आजूबाजूच्या वस्तूंचे, प्राण्यांचे तो फोटो शूट करायला लागला. मोठं होऊन आपणही फिल्ममेकर व्हावं असं रणवीरचं स्वप्न होतं यासाठी त्याने आपल्या पालकांना मनवलं होतं. मात्र यानंतर त्याला शैक्षणिक क्षेत्रात अनेक अपयशाचा सामना करावा लागला. मात्र यानंतर रणवीरनं कधीही मागे वळून बघितलं नाही.

पदवी घेतल्यानंतर रणवीरला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्यात रस नव्हता. तो फिटनेसमध्ये असल्याने त्याला फिटनेसचा व्यवसाय सुरू करायचा होता. सुरुवातीला, रणवीरने लोकांना तंदुरुस्त होण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली परंतु नंतर त्याला समजले की तो फिटनेसशी संबंधित अॅप लॉन्च करून आणखी कमाई करू शकतो. त्याला फिटनेस ट्रेनर्ससाठी Uber सारखे अॅप लाँच करायचे होते ज्याद्वारे लोक प्रशिक्षकांना त्यांच्या जागी ऑर्डर देऊ शकतील.

अॅप विकसित केल्यानंतर, रणवीरने संभाव्य गुंतवणूकदारांशी संपर्क साधला आणि त्याला मार्केटिंगच्या उद्देशाने सोशल मीडियावर काम करण्यास सुचवण्यात आले. त्या वेळी, कोणीतरी त्याला YouTube चॅनेल सुरू करण्याची शिफारस केली कारण त्या वेळी अनेक YouTube चॅनेल वेगाने वाढत होते आणि भारतीयांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे कोणतेही चांगले YouTube चॅनेल नव्हते. त्यामुळे त्यांना Youtube चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर रणवीरने त्याचे यूट्यूब चॅनल ऑगस्ट 2015 मध्ये BearBiceps नावानं सुरू केलं. यामध्ये तो माध्यमातून लोकांना फिटनेस आणि व्यायामचं महत्त्वं समजवून देऊ लागला. लाईफ हॅक्सचेही काही व्हिडीओ बनवू लागला. तसंच मेन्स फॅशनशी निगडित काही कन्टेन्ट बनवू लागला. हळूहळू त्याच्या चॅनेलला प्रसिद्धी मिळत त्याचे स्बस्क्राइबर वाढत गेले.

यानंतर रणवीरने एक पाऊल पुढे टाकत TRS म्हणजेच 'द रणवीर शो' नावानं एक नवीन पॉडकास्ट शो आपल्या चॅनेलवर सुरु केला. ज्या व्यक्तींना खूप कमी लोक ओळखतात पण ज्यांनी आयुष्यात महान काम केली आहेत अशा लोकांना बोलावून करणं आणि नवनवीन फॅक्टस जाणून घेणं हे या शोचं स्वरूप. तरुणाईनं हा शो अक्षरशः डोक्यावर घेतला. सुभाषचंद्र बोस यांच्यावर रिसर्च करणारे अनुज धर असू कोणी महान व्यक्ती रणवीरने मोठ्या हुशारीने सर्वांच्या मुलाखती घेत तरुणाईला वेड लावलं.

रणवीरच्या BearBiceps या चॅनेलचे सध्या तब्बल 42 लाख सबस्क्राइबर आहेत तर रणवीरला Forbs चा 30 Under 30 हा पुरस्कारही मिळाला आहे. आजकालच्या काळात तरुणांना जागृत करण्याची गरज असताना रणवीरसारखे तरुण ते प्रत्यक्षात घडवतात आणि अनेकांना प्रेरणा देतात. म्हणूनच आपणही रणवीर सारखं व्हावं अशी इच्छा तरुणांच्या मनात आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Digital prime time, Success stories, YouTube Channel