मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MBA करायचं आहे? कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही, पाहा कसं घेऊ शकता शिक्षण

MBA करायचं आहे? कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही, पाहा कसं घेऊ शकता शिक्षण

पदवीनंतर MBA करण्याची इच्छा आहे, पण कॉलेजमध्ये जाऊन पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पदवीनंतर MBA करण्याची इच्छा आहे, पण कॉलेजमध्ये जाऊन पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पदवीनंतर MBA करण्याची इच्छा आहे, पण कॉलेजमध्ये जाऊन पूर्णवेळ शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 सप्टेंबर :  देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. पदवी अभ्यासक्रम (Graduation) पूर्ण केल्यानंतर आर्थिक किंवा इतर कारणांनी अनेक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण (Post Graduation) घेऊ शकत नाहीत. अनेकदा पदवी घेतल्यानंतर लगेचच तरुणांना नोकरी करावी लागते. अशा वेळी नियमित महाविद्यालयात जाऊन पुढील शिक्षण घेणं अशक्य होतं. कमी वयात नोकरीला प्राधान्य देणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या सध्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन देशभरात अनेक संस्थांनी दूरस्थ शिक्षणातंर्गत (Distance Learning) एमबीए अभ्सासक्रमाची (MBA Course) सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत अनेक विद्यार्थी डिस्टंट एज्युकेशनवर भर देत आहेत. यात विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मुभा मिळत असते.

डिस्टंट एमबीए अभ्यासक्रमाचे फायदे

पूर्णवेळ महाविद्यालयात जाऊन ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी डिस्टंट एमबीए एक उत्तम पर्याय आहे. यात विद्यार्थी त्यांना मिळेल त्या वेळेनुसार अभ्यास करू शकतात. नोकरीसोबतच एमबीएचे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही हा अभ्यासक्रम उत्तम ठरतो. कॉर्पोरेट किंवा सरकारी संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी शिक्षण संस्थांत एमबीएची पदवी करू इच्छिणाऱ्यांसाठी काही जागा असतात. त्या ठिकाणी नोकरी करण्याचं उद्दिष्ट असणाऱ्यांनाही एमबीएचा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही वयोमर्यादा असत नाही.

डिस्टंट एमबीए अभ्यासक्रमासाठी अट काय?

डिस्टंट एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी उमेदवाराला मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून 40 ते 50 टक्के गुण मिळवणे क्रमप्राप्त असते. इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर प्रवर्गांसाठी 5 ते 10 टक्के गुणांची सवलत असते. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाप्रमाणे (Indira Gandhi National Open University) अनेक मुक्त विद्यापीठांमध्ये उमेदवाराला डिस्टंट एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकतं. यासाठी प्रवेश परीक्षा (OPENMAT Entrance Test) उत्तीर्ण करणं आवश्यक असतं.

LinkedIn वापरत असाल सावधान! 'या' फीचरचा उपयोग करून तुमचीही होऊ शकते फसवणूक

या बाबींची काळजी घेणं आवश्यक

डिस्टंट अभ्यासक्रमासाठी ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्या संस्थेची संलग्नतेबाबतची सर्व माहिती जाणून घ्यायला हवी. जिथे प्रवेश घ्यायचा आहे ती संस्था दूरस्थ शिक्षण परिषद (DEC) आणि विद्यापीठ अनुदान आयोगद्वारे (University Grants Commission) मान्यता प्राप्त आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. तुमची स्वत:ची आवड लक्षात घेऊन विषयाची निवड करायला हवी. त्यामुळे पुढील शिक्षणात अडचणी निर्माण होणार नाहीत. अभ्यासासाठी दिवसभरातील निश्चित वेळ ठरवून त्या वेळेत अभ्यास केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: Career, Education, MBA