JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Job Alert : भारत सरकारच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज

Job Alert : भारत सरकारच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज

भारत सरकारच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरी यापदासाठी क्वालिफाइड उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत.

जाहिरात

भारत सरकारच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय हे भारत सरकारचं एक अतिशय महत्त्वाचं मंत्रालय असून देशात आत्तापर्यंत अस्तित्वात आलेल्या विविध कंपनी कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी हे मंत्रालय काम करतं. प्रामुख्याने औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील भारतीय उपक्रमांचं नियमन करण्याची जबाबदारी एमओसीएवर आहे. मंत्रालयाअंतर्गत येणारं सर्व काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंत्रालयाला कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते. आताही एमओसीएनं आपल्या नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमधील स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरी या दोन पदांच्या 86 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे एमओसीएच्या देशभरातील विविध खंडपीठांमध्ये कंत्राटी तत्त्वावर ही कर्मचारी भरती केली जाणार आहे. देशभरातील राज्यांमध्ये तसंच राष्ट्रीय राजधानी दिल्ली (NCTD) येथे रिक्त असलेल्या 86 जागांपैकी स्टेनोग्राफर पदाच्या 53 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पदाच्या 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पदांसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज जमा करणं गरजेचं आहे. पोस्टचं नाव आणि संख्या: एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, 86 जागांपैकी स्टेनोग्राफर पदाच्या 53 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पदाच्या 33 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नोकरीचं ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांना, देशभरातील एनसीएलटीच्या अहमदाबाद, अमरावती, बेंगळुरू, चंडीगड, चेन्नई, कटक, गुवाहटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोची, कोलकत्ता, मुंबई, दिल्ली आणि दिल्ली/मुंबई अशा कोणत्याही बेंचमध्ये नोकरीसाठी पाठवलं जाईल. आदिवासी कल्याण मंत्रालयात उच्च पदासाठी भरती, येथे करा अर्ज मासिक वेतन: एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे स्टेनोग्राफरपदी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 45 हजार रुपये आणि प्रायव्हेट सेक्रेटरीपदी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 50 हजार रुपये वेतन दिलं जाईल. वयोमर्यादा: स्टेनोग्राफरपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 25 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे आणि प्रायव्हेट सेक्रेटरीपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 28 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे. नोट: एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कमाल वयोमर्यादेच्या कक्षेतील निवृत्त व्यक्तीदेखील स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरीपदासाठी या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निकष: स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरीपदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेली असावी. या शिवाय त्याच्याकडे डिक्टेशन आणि कॉम्प्युटरवर शॉर्टहँड डिक्टेशन ट्रान्सक्रिप्शन (50 शब्द प्रति मिनिट) यांसारखी कौशल्ये असणं गरजेचं आहे. सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; थेट DRDO मध्ये जॉब ओपनिंग्स; तुम्ही आहात का पात्र? बघा अनुभव: स्टेनोग्राफर पदासाठी तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. प्रायव्हेट सेक्रेटरी पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे नामांकित कार्यालयांसह विविध संपर्क आणि समन्वयाशी संबंधित कामं हाताळण्याचा अनुभव असला पाहिजे. निवड प्रक्रिया: एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरीपदासाठी कर्मचारी निवडताना त्यांची कौशल्य चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल. कंत्राटी असाइनमेंटच्या अटी व शर्ती: 1.  कराराचा कालावधी सुरुवातीला एक वर्षासाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत असेल. हा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो. पदावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामगिरीनुसार कालावधी वाढवायचा की नाही हे ठरवलं जाईल. 2.  स्टेनोग्राफर आणि प्रायव्हेट सेक्रेटरी या दोन्ही पदांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर असेल. ते किती वर्षे पदावर काम करतील हा निर्णय समाधानकारक कामगिरीवर अवलंबून असेल. अर्ज करण्याची प्रक्रिया: एनसीएलटी 2023 भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सविस्तरपणे नमूद करण्यात आलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या