केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने संयुक्त संचालक अर्थात जॉइंट डायरेक्टर या पदासाठी क्वालिफाइड उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. ही भरती डेप्युटेशन अर्थात प्रतिनियुक्ती तत्त्वावर असून, ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. आदिवासी मंत्रालयाने जॉइंट डायरेक्टर पदावर या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे. एकच पद रिक्त असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांचं वय जास्तीत जास्त 56 वर्षांपर्यंत असावं, असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सोशिऑलॉजी किंवा सोशल वर्क किंवा अँथ्रॉपॉलॉजी किंवा अर्थशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा गणित किंवा भूगोल यांपैकी एका विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला मासिक 39,100 रुपयांपर्यंत वेतन मिळेल, असं नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पात्रता निकष : केंद्र किंवा राज्य सरकारमधील किंवा केंद्रशासित प्रदेशातील खालील अधिकारी यासाठी पात्र ठरू शकतात. 1. या विभागात किंवा पॅरेंट केडरमध्ये नियमित तत्त्वावर अॅनालॉगस पोस्टवर असलेले… Education की Personal Loan? जाणून घ्या, मुलांच्या शिक्षणासाठी कोणतं ठरेल फायद्याचं.. 2. नियुक्तीनंतर दिलेल्या ग्रेडमध्ये किमान पाच वर्षं नियमित सेवा केलेले, 15600 ते 39100 या पेस्केलमध्ये PB-3 असणारे, शिवाय 6600 ग्रेड पे किंवा पॅरेंट केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये समकक्ष वेतन असलेले… इच्छुक उमेदवारांकडे 10 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यापैकी सात वर्षांचा अनुभव संशोधन किंवा प्रशिक्षण किंवा नियोजन किंवा मूल्यमापन किंवा भटक्या-विमुक्त जमाती आणि आदिवासी क्षेत्रातलं नियोजन आणि प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन किंवा सोशल सेक्टरल प्रोग्राम्स किंवा आदिवासी विकास प्रोग्राम्सची अंमलबजावणी यांचा असावा. तीन वर्षांचा अनुभव स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करणं आणि विश्लेषण करण्याचा असावा. सोशिऑलॉजी किंवा सोशल वर्क किंवा अँथ्रॉपॉलॉजी किंवा अर्थशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा गणित किंवा भूगोल यांपैकी एका विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली असल्यास प्राधान्य दिलं जाईल. तसंच, आदिवासी विकास, आदिवासी कल्याण, संबंधित कायदे आदींसंदर्भात राष्ट्रीय जर्नल्समध्ये लेखन किंवा संपादनाचा तीन वर्षांचा अनुभव असल्यासही प्राधान्य दिलं जाईल, असं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे.
अधिक माहिती आणि अधिकृत नोटिफिकेशन https://tribal.nic.in/TendersAdvertisment.aspx या लिंकवर उपलब्ध आहे. हे नोटिफिकेशन दोन जून 2023 रोजी प्रसिद्ध झालं आहे. तिथपासून 60 दिवसांच्या आत इच्छुकांनी अर्ज पाठवणं आवश्यक असल्याचं नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : दी अंडर सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, शास्त्री भवन, नवी दिल्ली - 110001