तुम्ही आहात का पात्र? करा चेक
मुंबई, 14 मार्च: दिल्लीमध्ये अनेक वुमन्स कॉलेजेस आहेत. त्यापैकी लेडी आयर्विन कॉलेज हे दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध वुमन्स कॉलेजेसपैकी एक आहे. लेडी आयर्विन कॉलेज हे होम सायन्स आणि फूड टेक्नॉलॉजी या दोन शाखांमध्ये विविध कोर्सेस प्रदान करतं. 1932 मध्ये स्थापना झालेल्या या कॉलेजमधून आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध महिलांनी शिक्षण घेतलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) 16व्या स्थानी असलेल्या या कॉलेजमध्ये आता नोकरीची संधी निर्माण झाली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत असलेल्या या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती सुरू झाली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून तीन आठवड्यांच्या आत किंवा 2 एप्रिल 23, या पैकी जी नंतरची तारीख असेल ती अंतिम तारीख मानण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. ‘एबीपी’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लेडी आयर्विन कॉलेजमधील रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, दिल्ली युनिव्हर्सिटी (du.ac.in) किंवा लेडी आयर्विन कॉलेजच्या (ladyirwin.edu.in) अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. कॉलेजमधील असिस्टंट प्रोफेसर पदासाठी केवळ ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवार colrec.uod.ac.in. या बेवसाईटचा वापर करू शकतात. 10वी पास उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर; महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 65 पदांची भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे वेगवेगळ्या विषयांतील असिस्टंट प्रोफेसरची आहेत. ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. Success Story: इतिहासाचा अभ्यास सोडून आले टेक्नॉलॉजीच्या दुनियेत; आता रोजचा तब्बल 9.50 लाख रुपये पगार निवड झाल्यानंतर या पदासाठी, प्रति महिना 57 हजार 700 रुपये ते 1 लाख 82 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इतर कोणत्याही प्रकारची तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार वरती दिलेल्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
लेडी आयर्विन कॉलेजला भारताचे ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या पत्नी लेडी डोरोथी आयर्विन, बडोदा आणि भोपाळच्या महाराणी, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, अॅनी बेझंट, कमला देवी चट्टोपाध्याय, मार्गारेट कोन्सिन्स यासारख्या प्रसिद्ध महिलाचं पाठबळं मिळालेलं आहे. स्थापना झाल्यापासून या कॉलेजनं कोट्यवधी मुलींना शिक्षण दिलं आहे.