मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Success Story: इतिहासाचा अभ्यास सोडून आले टेक्नॉलॉजीच्या दुनियेत; आता रोजचा तब्बल 9.50 लाख रुपये पगार

Success Story: इतिहासाचा अभ्यास सोडून आले टेक्नॉलॉजीच्या दुनियेत; आता रोजचा तब्बल 9.50 लाख रुपये पगार

टेक महिंद्राचे नवे एमडी आणि सीईओ मोहित जोशी

टेक महिंद्राचे नवे एमडी आणि सीईओ मोहित जोशी

आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांचं आधी इतिहासातील बॅकग्राउंड होतं आणि आता ते टेक्नॉलॉजीच्या विश्वात येऊन आपला ठसा उमटवत आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 मार्च: असं म्हणतात की अंगी जिद्द आणि काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. जगातील मोठमोठ्या कंपन्यांचे CEO किंवा डायरेक्टर ही भारतीय आहेत. आज हे सर्वजण करोडोंमध्ये पगार कमावत आहेत. या सर्वांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड हे मात्र टेक्नॉलॉजीचं आहे किंवा सायन्सचं आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांचं आधी इतिहासातील बॅकग्राउंड होतं आणि आता ते टेक्नॉलॉजीच्या विश्वात येऊन आपला ठसा उमटवत आहेत. नक्की कोण आहेत ते आणि काय आहे त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया.

मोठी खूशखबर! 'या' IIT मध्ये FREE ऑनलाईन कोर्स करण्याची सर्वात मोठी संधी; ही घ्या संपूर्ण लिस्ट

आम्ही बोलत आहोत टेक महिंद्राचे नवे एमडी आणि सीईओ मोहित जोशी यांच्याबद्दल. 22 वर्ष इन्फोसिसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर मोहित जोशी आता टेक महिंद्रासोबत नवा प्रवास सुरू करणार आहेत. टेक महिंद्रात एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती झाल्याची बातमी समोर येताच मोहित जोशी यांच्या लोकप्रियतेचा आणि प्रतिभेचा अंदाज लावता येतो. यानंतर, टेक महिंद्राचा शेअर आज इंट्राडेमध्ये प्रचंड वाढला आणि सुरुवातीच्या व्यवहारात तो 8 टक्क्यांपर्यंत चढला. मोहित जोशी एंटरप्राइझ टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंग सेक्टरमध्ये 2 दशकांहून अधिक काळ सेवा करत आहेत.

नाय.. नाय शक्यच नाय; 'या' शाळेची फी बघून विश्वासच बसणार नाही; जगातील सर्वात महागडी शाळा

मोहित जोशी हे गेल्या 22 वर्षांपासून इन्फोसिसशी संबंधित आहेत. या काळात मोहित जोशी यांनी बँकिंग प्लॅटफॉर्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑटोमेशन पोर्टफोलिओ, सेल्स ऑपरेशन्स, ट्रान्सफॉर्मेशन, सीआयओ फंक्शन आणि इन्फोसिस नॉलेज इन्स्टिट्यूटचे नेतृत्व केलं आहे. तर, इन्फोसिसच्या आधी, त्यांनी ANZ Grindlays आणि ABN AMRO बँक यांसारख्या जगातील काही मोठ्या कॉर्पोरेशनसाठी काम केलं आहे.

रोज कमावतात तब्बल 9.50 लाख रुपये

2021 मध्ये मोहितचा पगार 15 कोटींवरून 34 कोटींवर पोहोचला. इन्फोसिस फाइलिंगनुसार, त्यांना 2021-2022 मध्ये 34,89,95,497 रुपये (34.89 कोटी रुपये) ची भरपाई मिळाली. याचा अर्थ त्यांना दररोज 9.50 लाख रुपये मिळत होते. आपल्या कारकिर्दीत मोहितने आशिया, अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये काम केलं आहे. 2014 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्ये त्यांची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Startup Success Story, Success story, Technology