प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील
मुंबई, 12 जून: बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी JEE Mains आणि JEE Mains परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. यासाठीचे हॉल तिकिट्स लवकरच जारी केले जाणार आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे हॉल तिकिट्स कसे डाउनलोड करणार आणि कुठे बघता येणार हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. 12 जून 2022 रोजी जेईई मेन प्रवेशपत्र जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकदा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन ऍडमिट कार्ड अधिकृतपणे जारी करेल, तेव्हा उमेदवार NTA-nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवरून JEE मेन 2022 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. जुनं ते सोनं! गेल्या काही वर्षातील पेपर्समुळे JEE Mains मध्ये व्हाल Topper; ‘या’ लिंकवर मिळेल सर्व JEE Papers JEE Mains 2022 साठी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी JEE Main 2022 प्रवेशपत्राची अचूक तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट nta.ac.in वेबसाइट तपासत राहणे आवश्यक आहे. सर्व अपडेट्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE मुख्य परीक्षा 2022) दोन टप्प्यांत घेतली जाईल, जी जून आणि जुलैमध्ये घेतली जाणार आहे. JEE मेन 2022 फेज 1 ची परीक्षा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 रोजी होणार आहे. NITs (IITs), IITs आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (CFTIs) मध्ये BE/BTech अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE Mains परीक्षा घेतली जाते. JEE Mains: विद्यार्थ्यांनो, परीक्षेआधी उगाच फॉर्मुले लिहित बसू नका; इथे फॉर्मूल्यांची रेडिमेड List बघा ना असं डाउनलोड करा प्रवेशपत्र NTA ने अधिकृतपणे प्रवेशपत्र जारी केल्यानंतर JEE Main 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना खालील स्टेप्स वापराव्या लागतील. सुरुवातीला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. होमपेजवर, ‘JEE Main Admit Card 2022’ या लिंकवर क्लिक करा. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी आवश्यक क्रेडेन्शियल्स टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा. वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.