JOIN US
मराठी बातम्या / करिअर / धक्कादायक! टाटांच्या 'या' कंपनीमध्ये नेमकं चाललंय काय? लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ

धक्कादायक! टाटांच्या 'या' कंपनीमध्ये नेमकं चाललंय काय? लैंगिक छळाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ

नवोदितांना संधी देण्यातदेखील ही कंपनी अग्रेसर आहे. सध्या मात्र ही कंपनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. टीसीएसमध्ये लैंगिक छळाची प्रकरण वाढल्याची माहिती समोर आली आहे

जाहिरात

टाटांच्या कंपनीमध्ये लैंगिक छळ वाढतोय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16, जून:  टाटा उद्योग समूहाचा भाग असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) ही आयटी कंपनी प्रसिद्ध आहे. भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये या कंपनीचं नाव घेतलं जातं. या शिवाय, सर्वात जास्त नवोदितांना संधी देण्यातदेखील ही कंपनी अग्रेसर आहे. सध्या मात्र ही कंपनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. टीसीएसमध्ये लैंगिक छळाची प्रकरण वाढल्याची माहिती समोर आली आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये टीसीएसमध्ये लैंगिक छळाची 49 प्रकरणं दाखल झाल्याची नोंद आहे. 2021-22 मध्ये अशा तक्रारींची संख्या 36 होती. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात कंपनीतील वातावरण आणखी बिघडलं आहे. अधिक चिंताजनक बाब म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22मधील 16 प्रकरणांच्या तुलनेत 2022-23 च्या अखेरीस आठ लैंगिक छळाच्या प्रकरणांचा निकाल लागलेला नाही. 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भेदभावाच्या कमी तक्रारी समोर आल्या आहेत. असं असलं तरी, या दाव्यांचे गांभीर्य बघता टेक जायंट टीसीएसकडून अधिक सखोल आणि उघड प्रतिसादाची अपेक्षा आहे. कंपनीतील तक्रारी गोपनीयपणे हाताळल्या जातात आणि तक्रारी दाखल करणाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार केला जातो, असा टीसीएसनं दावा केलेला आहे. मात्र, लैंगिक छळाच्या तक्रारींची वाढती संख्या आणि अपारदर्शक पुनरावलोकन प्रक्रियेमुळे टीकाकारांनी कंपनीतील सुरक्षा उपायांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काय सांगता! साधा बल्ब बदलण्यासाठी कंपनी देतेय 1 कोटी पगार; तरीही कोणी अप्लाय करेना; कारण वाचून व्हाल शॉक लैंगिक छळाच्या घटनांच्या वाढत्या संख्येमुळे कंपनीतील कामाच्या वातावरणात विशिष्ट अडचण असल्याचं निदर्शनास येत आहे. त्याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कारण, लैंगिक छळ वगळता बालमजुरी, जबरदस्ती किंवा अनैच्छिक श्रम, वेतन समस्या किंवा इतर मानवी हक्क उल्लंघनांबद्दल कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. समोर आलेला रिपोर्ट हा कंपनीसाठी एक इशारा आहे की, छळ आणि भेदभावाच्या प्रकरणांना कंपनीकडून मिळणारा प्रतिसाद सुधारणं गरजेचं आहे. त्याकडे सतत दुर्लक्ष केल्यास कंपनीची अप्रतिष्ठा होऊ शकते. कंपनीला कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवरदेखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यात टीसीएस अग्रस्थानी आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीतील 6 लाख 14 हजार 795 कर्मचाऱ्यांपैकी एक चतुर्थांश कर्मचारी एका दशकाहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करू शकले आहेत. म्हणजेच एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी एका दशकाहून अधिक काळ टीसीएससोबत काम केलेलं आहे. इतर आयटी कंपन्यांच्या तुलनेत ही आकडेवारी नक्कीच उल्लेखनीय आहे. Mission Admission: विद्यार्थ्यांनो, अवघ्या काही दिवसांत होणार 11वीसाठी प्रवेश,‘ही’ कागदपत्रं रेडी आहेत ना? बघा लिस्ट टीसीएसचे चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर मिलिंद लक्कड म्हणतात, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्ही 2008 मध्ये आम्ही नेमलेल्या 25 बिझनेस लीडर्सच्या गटातील जवळपास सर्वच अजूनही टीसीएससाठी काम करत आहेत.” लक्कड यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात उल्लेख केला की, कंपनीकडे सध्या 1 लाख 25 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत ज्यांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीत काम केलं आहे.

“बिझनेस लिडर्सचा हा गट टीसीएसकडे असलेल्या खऱ्या सामर्थ्याचं उदाहरण आहे. ते आमच्या संस्कृतीचं, मूल्यांचं आणि संस्थात्मक आठवणींचे रक्षक आहेत. ग्राहकांना कंपनीकडून अपेक्षित असलेल्या गुवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आउटपूट देण्यासाठी कंपनीतील कर्मचारी महत्त्वाचे आहेत,” असं लक्कड म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या