JOIN US
मराठी बातम्या / करिअर / वर्क फ्रॉम होम, मूनलायटिंगबाबत नारायण मूर्ती यांचं मोठं विधान; म्हणाले, या फंदात....

वर्क फ्रॉम होम, मूनलायटिंगबाबत नारायण मूर्ती यांचं मोठं विधान; म्हणाले, या फंदात....

नारायण मूर्ती यांनी तरुणांना विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

जाहिरात

नारायण मूर्ती यांनी तरुणांना दिला मोलाचा सल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 फेब्रुवारी: नामांकित आयटी कंपनी इन्फोसिसचे फाउंडर नारायण मूर्ती हे आपल्या मोटिव्हेशन टॉक्समुळे नेहमीच चर्चेत असतात. नेहमीच तरुण पिढीला मार्गदर्शन करत असतात. आता नारायण मूर्ती यांनी तरुणांना विशेषतः वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुणांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वर्क फ्रॉम होम हे एक ट्रॅपप्रमाणे आहे यात अडकू नका असं नारायण मूर्ती यांनी म्हंटलं आहे. पुण्यात आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या फंदात पडूच नये असं आवाहन नाराय मूर्ती यांनी केलं आहे . आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात जाणे आणि मुनलायटिंग या गोष्टी तरुणांना करिअरमध्ये फकीर समोर घेऊन जाणार नाहीत असंही नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे. 6 महिन्यांसाठी 1 कोटी रुपये पॅकेज देतेय ही कंपनी; तरीही मिळेना कर्मचारी; नक्की काम आहे तरी काय? आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमधून काम करणे आणि घरून काम करणे ही कल्पना चुकीची आहे. देशाचं भविष्य तरुणांच्या हातात आहे आणि कोणीही मेहनत आणि कठोर परिश्रमाशिवाय पुढे जाऊ शकत नाही म्हणून वर्क फ्रॉम हा ट्रॅप आहे असं त्यांनी म्हंटल आहे. 300 वर्षात पहिल्यांदाच देशाने काही यशाची चव चाखली आहे, आणि आपण मिळवलेल्या छोट्याशा यशावर आपल्याला एकवटले पाहिजे आणि मोठ्या यशाचे ध्येय ठेवले पाहिजे. जगात असा कोणताही देश नाही ज्याने कठोर परिश्रम न करता जगाचा मान मिळवला आहे, आपली समृद्धी वाढवली आहे, आर्थिक प्रगती केली आहे. म्हणूनच कामाची नीतिमत्ता महत्त्वाची आहे, कठोर परिश्रम महत्त्वाचे आहेत पण आळशीपणा चांगला नाही यामुळे तुमची प्रगती होणार नाही असंही नारायण मूर्ती म्हणाले. IT Jobs: ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय लवकरात लवकर व्हावे निर्णय भारतातील बिझनेस भातातच टिकवून ठेवायचे असतील तर निर्णय लवकरात लवकर होणं आवयक आहे. जर व्यापारी लोकांनी फक्त भारतातच राहावं आणि भारतातच सर्व काही करावं असं वाटत असेल तर मला वाटते की त्यांना हे करण्यात खूप आनंद होईल. आम्ही सर्व आदरपूर्वक विनंती करतो की त्वरित निर्णय घेतले पाहिजेत, त्यांची त्वरीत अंमलबजावणी झाली पाहिजे असंही नारायण मूर्ती म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या