जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IT Jobs: ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

IT Jobs: ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

IT Jobs: ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनी सध्या जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सच्या शोधात आहे

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 फेब्रुवारी:   महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांचा भारतीय आयटी क्षेत्रावर काही परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी भरती सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीनं तंत्रज्ञांची नियुक्ती सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता डेलॉइट इंडियानं कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनी सध्या जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सच्या शोधात आहे. ‘टेकगिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डेलॉइट इंडियानं आपल्या दिल्ली येथील कार्यालयात नवीन जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सना संधी देण्याचा निर्णय घेताल आहे. MSRTC Bharti: हा गोल्डन चान्स सोडूच नका; ST महामंडळात 10वी पाससाठी बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय जावा डेव्हलपर पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील: 1. डब्ल्यूएचओ गाइडलाइन्सनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून दिल्लीमध्ये काम करण्यासाठी चार ते सहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. 2. एंटरप्राईज लेव्हलवर असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपचा वापर देशातील एक लाख जणांनी केला आहे. त्यामुळे कंपनी तांत्रिकदृष्ट्या मजबूत व्यक्तींच्या शोधत आहे, ज्या या वेब अ‍ॅप्लिकेशन्सच्या देखभाल आणि वाढीसाठी डिलिव्हरेबल्सची जबाबदारी घेऊ शकतात. 3. जावा-आधारित वेब अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्समध्ये किमान तीन वर्षे कामाच अनुभव गरजेचा आहे. 4. जावा 1.8, स्प्रिंग-बूट, अँग्युलर जेएस या तंत्रज्ञानाचा अनुभव आवश्यक. 5. PostgreSQL किंवा इतर RDBMS डेटाबेसमधील अनुभव आवश्यक. 6. मागणी आणि प्राधान्याच्या आधारावर टीमसोबत काम करण्याची क्षमता आवश्यक. 7. गरजा आणि फील्ड इश्यूज समजून घेण्यासाठी, कामाच्या प्रगतीबाबत संवाद साधण्यासाठी चांगली संभाषण कौशल्ये आवश्यक. ऑफिसमध्ये तुम्हीही एकटे पडलात का? इतरांशी बोलण्याची भीती वाटते? टेन्शन नको; असे व्हा कॉन्फिडन्ट डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअरच्या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील: 1. अहवालांसाठी आवश्यक स्पष्टीकरण देण्याची क्षमता पाहिजे. 2. टेक्निकल सोल्युशन डिझाइनच्या दृष्टिने सर्व गरजा एकत्रित करून ती सोल्युशन्स तयार करण्याचं अंदाजपत्रक तयार करणं. 3. टेक्निकल डिझाइनच्या दृष्टिकोनातून फंक्शनल स्पेक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये योगदान देणं. 4. टेक्निकल सोल्युशन डिझाइनवर आधारित रिपोर्ट्स आणि व्हिज्युअलायझेशन्स विकसित करणं. 5. रिक्वायरमेंट डेफिनेशन्स किंवा तांत्रिक डिझाइन प्रश्नांच्या सपोर्टसाठी प्रोटोटाइपिंग आणि पीओसी करणं. 6. युनिट चाचण्या, डिफेक्ट रिझोल्युशन आणि हायपर केअर कार्यान्वित करणं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात