महाराष्ट्र टपाल विभाग
मुंबई, 28 मे: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस ऑफ इंडियाने ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 12828 रिक्त पदं भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मे पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 असेल. तर अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय 12 ते 14 जून 2023 दरम्यान उपलब्ध असेल. या पदासांठी पात्रतेच्या अटी, वयोमर्यादा, पगार व निवडीचे निकष काय असतील, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. या संदर्भात ‘जागरण’ने वृत्त दिलं आहे. पात्रतेच्या अटी उमेदवारांनी भारत सरकार, राज्य सरकार किंवा भारतातील केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळामधून गणित आणि इंग्रजी विषयांसह इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांना कॉम्प्युटर ज्ञान आणि सायकलिंगचं ज्ञान असावं. Career After 12th: इंजिनिअर आणि डॉक्टरच नाही तर 12वीनंतर या क्षेत्रांमध्ये करा करिअर; लाखो रुपये मिळेल सॅलरी वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षं असावं. पगार ब्रँच पोस्ट मास्तर - 12,000 रुपये ते 29,380 रुपये असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर - 10,000 रुपये ते 24,470 रुपये 4थी पास आहात ना? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडूच नका; या पत्त्यावर लगेच पाठवून द्या अर्ज अर्ज भरण्याची फी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. पण महिला अर्जदार, SC/ST अर्जदार, PwD अर्जदार आणि ट्रान्सवुमेन अर्जदारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. निवड प्रक्रिया सिस्टिम जनरेटेड मेरिट लिस्ट व अर्जदारांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर त्यांची निवड केली जाईल. विद्यार्थ्यांनी विविध अधिकृत बोर्डांच्या 10 वीच्या परीक्षेत मिळवलेले गुण किंवा ग्रेड किंवा पॉइंट्स यांच्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
अर्ज कसा करायचा - indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. - रजिस्टरवर क्लिक करा आणि होम पेजवर लॉग इन डिटेल्स जनरेट करा. - आवश्यक असलेले डिटेल्स टाकून फॉर्म पूर्ण भरा. - त्यानंतर आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि अॅप्लिकेशन फी भरा. - शेवटी अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी त्या अर्जाची कॉपी डाउनलोड करा.