JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Life@25 : अनेकदा अपयश आलं, शेवटी रणनीती बदलली; पुढल्याच प्रयत्नात IAS झाले अमित काळे

Life@25 : अनेकदा अपयश आलं, शेवटी रणनीती बदलली; पुढल्याच प्रयत्नात IAS झाले अमित काळे

आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अमित यांनी समाधानी न राहता पुन्हा नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 ऑक्टोबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, या हेतूने न्यूज 18 लोकमत डिजिटल खास तरुणाईसाठी Digital Prime Time Special लाइफ @25 हा विशेष कार्यक्रम सुरू करत आहेत. आज जाणून घेऊयात, मराठी मातीत जन्माला आलेले आएएस अधिकारी अमित काळे यांच्याबाबत. देशातील सर्वात खडतर परीक्षा म्हणजे यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. काहींना त्यांच्या मेहनतीमुळे आणि झोकून देऊन पहिल्याच प्रयत्नात यश मिळते, तर काहींनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर हे स्थान मिळवले. अमित काळे यांनी चौथ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा पास करत आपले स्वप्न साकार केले. अमित काळे यांच्या संघर्षाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. नागरी सेवा परीक्षेच्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली होती. परंतु अंतिम फेरीपर्यंत ते पोहोचू शकले नाही. मात्र, दोनदा नापास होऊनही अमित यांनी कधीच हार मानली नाही आणि फक्त अभ्यास सुरू ठेवला. तिसर्‍या प्रयत्नात अमित यांनी पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली आणि त्याला यशही मिळाले. पण त्यांना अजूनही अपेक्षित स्थान मिळाले नाही. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अमित यांनी समाधानी न राहता पुन्हा नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अखेरीस, अमित काळे यांनी सन 2018 च्या नागरी सेवा परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवले आणि त्यांना हवे असलेल्या आयएएस पदाला गवसणी घातली. 2018 मध्ये, जेव्हा अमित यांची अंतिम निवड झाली आणि ते 2019 च्या बॅचचे IAS अधिकारी झाले. 2019मध्ये ते यावेळी इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसेसमध्ये प्रशिक्षण घेत होते. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी आपल्या क्षमतेनुसार रणनीती तयार केली पाहिजे, असे अमित काळे यांना वाटते. या परीक्षेत तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयावर अधिक लक्ष केंद्रित करा. उरलेल्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर अवघड विषयांच्या तयारीसाठी वेळ काढून ठेवा. अभ्यासासोबतच वेळेच्या व्यवस्थापनावरही भर द्या. यासाठी तुम्ही दिलेल्या वेळेत मागील वर्षाचे पेपर सोडवण्याचा सराव करू शकता, असेही ते सांगतात. हेही वाचा -  Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात ‘हा’ सल्ला अमित यांच्या मते, मर्यादित आणि निवडक पुस्तकांसह नागरी सेवा परीक्षेची तयारी करा. याशिवाय तुम्ही अभ्यासासाठी इंटरनेटपण वापरू शकता. मात्र, अभ्यासासोबतच नियमित उजळणी आणि उत्तर लेखनाचा सराव आवश्यक आहे. या कठीण परीक्षेत एकाच वेळी यश मिळवणे खूप कठीण आहे, त्यामुळे अपयशी ठरल्यास निराश होण्याऐवजी दुप्पट उत्साहाने प्रयत्न करा, असा सल्लाही ते देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या