नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : सध्या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यू-ट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अल्पावधीत प्रसिद्धी मिळताना दिसते. यू-ट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून अनेकजण लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर स्पर्धाही प्रचंड वाढली आहे. पुढील काही वर्षांमध्ये यात बरीच करिअर वृद्धी नोंदवली जाऊ शकते. यू-ट्यूबवर विशिष्ट क्षेत्राशी संबंधित व्हिडिओ अपलोड करून लाखोंची कमाई कशी करता येऊ शकते, याचा विचार केला जाणं खूप महत्त्वाचं आहे. यू-ट्यूबवर कुणीही स्वत:चं चॅनेल बनवू शकतं. यासाठी फक्त एका जीमेल आयडीची आवश्यकता असते. आपल्याला कुठल्या संकल्पनेवर आधारित व्हिडिओ तयार करायचा आहे याची माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. दररोज वेगळा व्ह्लॉग तुम्ही बनवू शकता, अन्यथा मनोरंजन किंवा इन्फोटेन्मेंटशी संबंधित व्हिडिओ बनवून त्यावरही चांगला कंटेट निर्माण केला जाऊ शकतो. सर्वप्रथम चांगली थीम निवडा - यू-ट्यूब चॅनेल बनवणं खूप सोपं असलं तरी ते चालवणं बरचं कठीण आहे. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे त्याची थीम आधीच निश्चित करायला हवी. ज्या विषयाचे तुम्हाला सखोल ज्ञान आहे त्यावरच काम केल्यास त्याचा फायदा मिळू शकतो आणि सहजरित्या तुम्ही लोकांशी जोडले जाऊ शकता. नावीन्यपूर्ण नाव निवडा - यू-ट्यूब चॅनेलचं नाव विचारपूर्वक ठेवायला हवं. चॅनेलचं नाव हे नावीन्यपूर्ण, सोपं आणि पाहणाऱ्यांच्या मनांशी सहज जोडलं जाणारं हवं. या तिन्ही गोष्टी असतील तर लोकांना चॅनेलचं नाव शोधण्यास व सबस्क्राइब करण्यास सोपं जाईल. तुमच्या यू-ट्यूब चॅनेलचं नाव विषयाशी निगडीत असायला हवं, याचीही तितकीच काळजी घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. हेही वाचा - विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याचा गोल्डन चान्स, सोलापूर विद्यापीठ काढणार स्टार्टअप यात्रा चॅनेलला असे मिळतील हिट्स - चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करताना लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचवण्यासाठी टायटल आणि कीवर्ड्सवर अधिक लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. व्हिडिओचे टायटल आणि कीवर्ड्स जितके ट्रेंडिंग असतील तितकंच लोक त्या व्हिडिओपर्यंत पोहोचू शकतील. यू-ट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अवश्य शेअर करत राहावं. यातून अनेक सब्सक्राइबर मिळू शकतात. यू-ट्यूबवर अशी होईल कमाई - यू-ट्यूब चॅनेल तयार केल्यानंतर लगेच कमाई होत नाही. यासाठी संयम बाळगावा लागतो. तुम्ही तुमच्या कंटेंटला उत्तम बनवण्यासाठी काम करत राहणं गरजेचं आहे. आपण निवडलेल्या विषयापासून कधीही दूर जाऊ नये. हळूहळू व्हिडिओ असंख्य लोकांपर्यंत पोहोचू लागतात तसं कमाईही व्हायला लागते. सुरूवातीला व्हिडिओ मॉनिटाइज झाल्यानंतर अटेंडन्सशी जोडले गेल्यावर प्रत्येक क्लिकवर 25 पैशांपासून 1 रुपयांपर्यंत रक्कम मिळते. जसजशी पाहणाऱ्यांची संख्या वाढते तसं कमाईतही वृद्धी होत राहते.