JOIN US
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! IAS टीना दाबींना मिळतो एवढा पगार, इतर सुविधांबद्दल तर बोलायलाच नको

काय सांगता! IAS टीना दाबींना मिळतो एवढा पगार, इतर सुविधांबद्दल तर बोलायलाच नको

टीना डाबी 2015 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या त्यांच्या बॅचच्या टॉपर होत्या. टीना राजस्थान केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या जैसलमेर जिल्ह्याच्या 65 व्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत. पण, कलेक्टरला किती पगार मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का?

जाहिरात

IAS टीना दाबींना मिळतो एवढा पगार, इतर सुविधांबद्दल तर बोलायलाच नको

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 फेब्रुवारी: देशातील काही चर्चित आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक टीना डाबी आहेत. देशातील सर्वांत प्रसिद्ध महिला आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या टीना डाबी या राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत. यूपीएससीच्या टॉपर राहिलेल्या टीना डाबी या त्यांची दोन लग्न आणि कामामुळे चर्चेत राहिल्या. खरं तर यूपीएससी पास केल्यानंतर कलेक्टर होण्यापर्यंतचा प्रवासही अनेक वर्षांचा असतो. यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. त्यानंतर वेगवेगळ्या विभागांत पोस्टिंग दिलं जातं. त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवायचं हे ठरवलं जातं. टीना डाबी 2015 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या त्यांच्या बॅचच्या टॉपर होत्या. टीना राजस्थान केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या जैसलमेर जिल्ह्याच्या 65 व्या कलेक्टर म्हणून काम पाहत आहेत. पण, कलेक्टरला किती पगार मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यांचा पगार आणि सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांबद्दल सांगणार आहोत. टीना डाबींचा पगार किती? राजस्थान सरकारमधील जिल्हाधिकाऱ्यांचं वेतन 1.34 लाख ते 1.45 लाख रुपये आहे. या पूर्वी आयएएस टीना फायनान्स विभागात कार्यरत होत्या. तेव्हा त्यांचा पगार 56100 रुपये महिना होता. पण, जेव्हा एखादा आयएएस अधिकारी कॅबिनेट सचिव पदावर पोहोचतो तेव्हा त्याला दरमहा सुमारे 2,50,000 रुपये वेतन दिलं जातं. आयएएससाठी सर्वोच्च पद कॅबिनेट सचिव असतं. या पदावर सर्वाधिक पगार मिळतो. हेही वाचा:  HPCL Recruitment 2023: तब्बल 63,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; ग्रॅज्युट्ससाठी बंपर पदभरती इतर कोणत्या सुविधा मिळतात? आयएएस अधिकाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अनेक सुविधा मिळतात. त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या पे-बँडनुसार इतर लक्झरी सुविधा दिल्या जातात. पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला महागाई भत्ता (DA), हाउस रेंट अलाउन्स (HRA), सब्सिडाइज्ड बिलं, मेडिकल अलाउन्स आणि कन्व्हेन्स अलाउन्स दिले जातात. या शिवाय पे-बँडच्या आधारे आयएएस अधिकाऱ्यांना घर, सुरक्षा, कूक आणि इतर स्टाफसह अनेक सुविधा दिल्या जातात. आयएएस अधिकाऱ्याला ये-जा करण्यासाठी गाडी आणि ड्रायव्हरची सुविधाही मिळते. या शिवाय पोस्टिंगच्या काळात कुठे जावं लागलं तर प्रवास भत्त्याशिवाय तिथे सरकारी घरही दिलं जातं.

जैसलमेर डेझर्ट फेस्टिव्हलमध्ये टीना डाबींना भेटता येणार- सध्या जैसलमेरमध्ये ‘डेझर्ट फेस्टिव्हल’चं आयोजन करण्यात आलं आहे. जैसलमेरच्या या डेझर्ट फेस्टिव्हलमध्ये म्युझिकल नाईट, एअर वॉरियर ड्रिलसह अनेक रंगतदार कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आयएएस टीना डाबी यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिथे टीना यांना भेटता येणार आहे. तिथे भेटल्यावर त्यांच्याकडून तुम्ही करिअर मार्गदर्शन घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या