सावधान! नवीन कंपनीत जुन्या बॉसबद्दल या गोष्टी सांगाल तर....
आजकालच्या काळात कोणीही कंपनीत 1-2 वर्षांपेक्षा जास्त काम करत नाही.
तरुण पिढी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जॉब स्विच करत असतात.
एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत मुलाखत देताना मात्र आपण जुन्या कंपनीविषयी काही वाईट बोलून जातो.
तसंच तुमचं जुन्या बॉससोबत पटत नसेल तर त्यांच्याविषयी आपण मुलाखतीत वाईट बोलतो. यामुळे तुमची नोकरी जाऊ शकते.
म्हणूनच तुमच्या जुन्या बॉसबद्दल काही गोष्टी न सांगणं महत्त्वाचं आहे. कोणत्या ते जाणून घेऊया.
'माझं माझ्या जुन्या बॉससोबत कधीच पटलं नाही' असं चुकूनही नवीन बॉसला सांगू नका.
'आमचे जुने बॉस प्रचंड रागीट आणि वाईट होते' हे वाक्य म्हणजे तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा.
'मला माझ्या जुन्या बॉसचे सर्व सिक्रेट्स माहिती आहेत' असंही मुलाखतीदरम्यान सांगू नका.
जुन्या कपंनीच्या आणि बॉसबद्दलच्या खासगी गोष्टी नवीन कंपनीला सांगू नका. यामुळे अडचणीत येऊ शकता .
नवीन कंपनी जॉईन करताना फ्रेश राहा आणि नेहमी जुन्या कंपनीतील पॉझिटिव्ह अनुभवांबद्दल सांगा.