JOIN US
मराठी बातम्या / करिअर / फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! 'ही' मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी

फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! 'ही' मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी

पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024मध्येही लॅटरल हायरिंगवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी 15 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल:  आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या काही प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेक कंपनीने यंदा 2023मध्ये अनेक फ्रेशर्सना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आता पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2024मध्येही लॅटरल हायरिंगवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनी 15 हजार फ्रेशर्सची भरती करणार आहे. कंपनीने नुकताच हा आकडा जाहीर केला. यामुळे कॅम्पसद्वारे नोकरभरतीला चालना देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ‘कंटेंट डॉट टेकगिग’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. लॅटरल हायरिंग कमी करण्यासाठी एचसीएलने यंदा फ्रेशर्सची भरती केली. आता पुढच्या वर्षीही फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. फ्रेशर्सना प्रशिक्षण देऊन विविध प्रोजेक्ट्समध्ये त्यांना कसं सामावून घेता येईल हा आमचा उद्देश आहे. फ्रेशर्सना कंपनीत स्थान देता येऊ शकतं, असं आमच्या पुरवठा विभागाची आकडेवारी सांगते, असं एचसीएल टेकचे सीईओ विजयकुमार यांचं म्हणणं आहे.

यंदा कंपनीने 27 हजार फ्रेशर्सना नोकरी दिली. त्यापैकी काही उमेदवारांचं प्रशिक्षण अजूनही सुरू आहे. आता पुढच्या वर्षीच्या नोकरभरतीचा आकडा जाहीर करणारी ही पहिलीच कंपनी आहे. विजयकुमार यांच्या मते, उत्पादन आणि उच्च तंत्रज्ञानामधले काही प्रोजेक्ट्स सध्या रखडले आहेत. टेक्नॉलॉजीवर खर्च करण्यासाठीचं बजेट क्लाएंट्सनी कमी केलं आहे, हे त्यामागचं कारण आहे. Career Tips: 12वीनंतर लाखो रुपये पगार असणारी नोकरी हवीये? मग ‘हे’कोर्सेस कराच आर्थिक वर्ष 2022-23च्या चौथ्या तिमाहीसाठी कंपनी त्यांच्या 85 टक्के कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असल्याचंही कंपनीनं सांगितलंय. आधीच्या तिमाहीप्रमाणेच कंपनीने नफा मिळाल्यावर त्याबाबतची घोषणा केली आहे. कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर (सीपीओ) राम सुंदरराजन यांनी बैठकीमध्ये व्हेरिएबल पेबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना या तिमाहीत 85 टक्के कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार असल्याचं घोषित केलं. अर्थात हा लाभ देताना त्यांनी पॉलिसीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचंही सूचित केलं. “व्हेरिएबल पे हा केवळ 5 टक्केच असतो. व्हेरिएबल पेबाबतच्या पॉलिसीमध्ये सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही,” असं सुंदरराजन म्हणाले. आधी नॉक करावं की आधी दार उघडावं? मुलाखतीच्या रूममध्ये जाताना कसं बनेल पहिलं इम्प्रेशन? या घ्या टिप्स गेल्या आठवड्यापर्यंत कंपनीचा कॉर्पोरेट वार्षिक नफा 10.80 टक्के वाढून 3983 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. गेल्या वर्षीच्या मार्चच्या तिमाहीत हा नफा 3593 कोटी रुपये होता. कंपनीच्या या तिमाहीच्या सेल्समध्ये 17.70 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली. गेल्या वर्षीच्या 22,597 कोटी रुपयांच्या तुलनेत या वर्षी 26,060 कोटी रुपये कंपनीला मिळाले. कंपनीला झालेल्या नफ्यामुळे यंदाही कंपनीने व्हेरिएबल पेचं धोरण बदललं नाही. तसंच फ्रेशर्सना संधी देण्याची भूमिकाही कंपनीने कायम ठेवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या