अंशिका वर्मा
नोएडा, 10 जुलै : आपल्या देशातील अनेक आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या प्रेरणादायी आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर पहिल्या किंवा दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आणि ते अधिकारी झाले. काही जण कोचिंग न घेताही अधिकारी झाले. याच यादीतलं एक नाव म्हणजे आयपीएस अंशिका वर्मा होय. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील अंशिका वर्मा ‘ब्युटी विथ ब्रेन’ आहे. तिने प्रचंड मेहनत व अभ्यास करून 2020 मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय. अशिंकाने कोचिंग घेतलं नव्हतं, तसेच ती दुसऱ्याच प्रयत्नात अधिकारी झाली. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती कामाच्या अपडेट्स शेअर करत असते. तिच्या साधेपणाचे लाखो चाहते आहेत. तिला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.
नोएडामधून केलं इंजिनीअरिंग अंशिका वर्माने प्राथमिक शिक्षण नोएडातून पूर्ण केलं. त्यानंतर 2014-2018 मध्ये गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. ची डिग्री पूर्ण केली. मनात होती सरकारी नोकरी करायची इच्छा अंशिकाच्या मनात सरकारी नोकरी करायची इच्छा होती. त्यामुळे बी.टेक केल्यानंतर ती प्रयागराजला आली. इथ तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. 2019 मध्ये तिने प्रथमच परीक्षा दिली. मात्र, त्यात ती अपयशी झाली, पण हिंमत न हारता तिने मेहनत सुरूच ठेवली. कोणतंही कोचिंग न घेता झाली आयपीएस अंशिका वर्माने तिच्या आधीच्या चुका सुधारल्या आणि 2020 मध्ये दुसऱ्यांदा परीक्षेला बसली. यामध्ये अंशिकाने प्रीलिम आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुलाखतीतही चांगले गुण मिळवले. अंशिकाने ऑल इंडिया रँक 136 मिळवली. तिची आयपीएस म्हणून निवड झाली व उत्तर प्रदेश केडर मिळालं. अशा प्रकारे ती उत्तर प्रदेश केडरमधील सिव्हिल सर्व्हंट झाली. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने तयारीसाठी कोणतंही कोचिंग लावलं नव्हतं. आई-वडिलांना लेकीचा अभिमान अंशिकाचे वडील उत्तर प्रदेश विद्युत निगम लिमिटेडमधून (UPEL) निवृत्त कर्मचारी आहेत. तिची आई गृहिणी आहे. इंजिनीअर असलेली मुलगी आता सिव्हिल सर्व्हंट झाल्याचा आणि तिच्या यशाचा पालकांना प्रचंड अभिमान आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स अंशिका वर्मा तिच्या लूकसाठीही ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचं फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर फॉलोअर्स लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.