मराठी बातम्या / बातम्या / करिअर / Instagram वरील एक पोस्ट बघणं महिलेला पडलं महागात; जॉब लावून देण्याच्या बहाण्याने केलं धक्कादायक कृत्य

Instagram वरील एक पोस्ट बघणं महिलेला पडलं महागात; जॉब लावून देण्याच्या बहाण्याने केलं धक्कादायक कृत्य

महिलेला आर्थिक गंडा

नोकऱ्या देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे घेऊन गायब होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय.


मुंबई, 28 जानेवारी:   सोशल मीडियाचा वापर करून नोकरी देण्याच्या बहाण्यानं एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईमध्ये हा प्रकार घडलाय. स्वतःची फसवणूक झाल्याचं संबंधित महिलेच्या लक्षात येताच, तिनं चितळसर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिलीय. त्यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.

आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त फोटो आणि मेसेज शेअर करण्यापुरता मर्यादित नाही. तर आता फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म आभासी केंद्र बनले आहेत. व्यवसाय, नोकरी शोधणं, पैसे मिळवणं यासाठीदेखील हे प्लॅटफॉर्म वापरले जातात. मात्र, आता याचाच फायदा गुन्हेगार घेऊ लागलेत. सोशल मीडियाचा वापर करताना एक छोटीशी चूक महागात पडल्याची अनेक उदाहरणं आता समोर येतात. नोकरी शोधणाऱ्यांसाठीसुद्धा हे प्लॅटफॉर्म आता सुरक्षित राहिलेले नाहीत. येथे नोकऱ्या देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांकडून पैसे घेऊन गायब होत आहेत. असाच एक प्रकार नुकताच समोर आलाय. मुंबईतील एका महिलेला नोकरी देण्याच्या बहाण्यानं लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.

खाकी वर्दीतील माणुसकी! 5 वर्षीय बलात्कार पीडितेसाठी उभारला निधी; शाळेचीही केली व्यवस्था

इन्स्टाग्रामवरची पोस्ट बघायचा मोह झाला अन्...

ठाणे येथील एका 26 वर्षीय महिलेची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. तिला नोकरी देण्याच्या नावाखाली 5,38,173 रुपयांना गंडा घालण्यात आला. पीटीआयच्या वृत्तानुसार, संबंधित महिला इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत असताना एका पेजवर तिनं नोकरीची जाहिरात पाहिली. त्यानंतर तिनं संबंधित नोकरीच्या जाहिरातीवर क्लिक केले. त्यामुळे ती इन्स्टाग्रामच्या पेजवरून एका वेबसाइटवर गेली. महिलेनं वेबसाइटवरील सूचनांचं पालन करीत सर्व तपशील भरले. त्यानंतर महिलेला ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित महिलेनं या वेबसाइटवर 6 दिवसांत एकूण 5,38,173 रुपये भरले.

इतके पैसे दिल्यानंतर महिलेनं नोकरीसाठी संबंधित वेबसाइटवर असलेल्या नंबरवर फोन केला, पण तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, संबंधित महिलेनं पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

 गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

- जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर नोकरीची पोस्ट पाहाल, तेव्हा प्रथम संबंधित कंपनीची अधिकृत वेबसाइट शोधा. तसंच पोस्ट खरी आहे की नाही, ते तपासा.

- सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्लिक बाइट हेडलाइन देऊन लोकांना आमिष दाखवतात आणि पैसे कमवतात, हे लक्षात ठेवा.

- कंपनीचे नाव ऑनलाइन शोधा. ही कंपनी अस्तित्वात आहे किंवा नाही, हे तपासा. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क करा.

- सोशल मीडियावर असणारी जाहिरात बारकाईने पहा. त्यात व्याकरणाची चूक असू शकते. अनेकदा गुन्हेगार फार शिकलेले नसतात, आणि इंग्रजी लिहिण्यात चुका करतात.

दरम्यान, आजकाल ऑनलाइन फसवणुकीची प्रकार खूप वाढले असून सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहणं गरजेचं आहे.

First published: January 28, 2023, 17:18 IST
top videos
  • Pune News : राजा-सोन्याच्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मान, पाहा कशी मिळाली संधी Video
  • Solapur News : शेतकऱ्यानंचं तयार केलं फळबागांसाठी खास यंत्र, कमी पैशात मिळणार मोठा फायदा, Video
  • Dombivli News : अंत्यविधीसाठी मिळणार 5 हजारांची मदत, KDMC ची अशी आहे अट Video
  • Mumbai News : काहीही! कधी खाल्ला का टोमॅटो वडापाव? एकदा VIDEO तर पाहा
  • Chhatrapati Sambhaji Nagar News : पालकांच्या खिशाला लागणार कात्री, पुस्तकांच्या किंमती वाढल्या, पाहा दरवाढीचे कारण Video
  • Tags:Financial fraud, Money fraud

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स