मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

गुगलमुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, कधी-कधी गुगलचा वापर त्रासदायकदेखील ठरू शकतो. गुगल किंवा इंटरनेट वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या असल्याचं चित्र आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 जानेवारी : सध्याच्या फास्ट फॉरवर्ड जगात टेक जायंट 'गुगल' अतिशय उपयुक्त ठरत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या दैनंदिन जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. कारण, गुगलमुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, कधी-कधी गुगलचा वापर त्रासदायकदेखील ठरू शकतो. गुगल किंवा इंटरनेट वापरामुळे सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत एका व्यक्तीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात गुगलचा वापर करून महिलेची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

    समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं तिच्या घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी 'पॅकर्स अँड मूव्हर्स'शी संपर्क साधला होता. पीडितेनं सांगितलं की, तिनं फोन केल्यानंतर चार लोक तिच्या घरी आहे. त्यापैकी एकाने तिच्याकडून 2500 रुपये घेतले आणि सामान हलवण्यास सुरुवात केल्याचं तिला सांगितलं. त्यानंतर चौघांनी टीव्ही उचलून नेला. टीव्ही नेल्यानंतर बाकीचं सामान घेऊन जाण्यासाठी कोणीही परत आले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं.

    पीडितेनं या प्रकरणाची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. वरकरणी ही घटना किरकोळ गुन्ह्यासारखी वाटत असली तरी तिची तीव्रता यापेक्षा मोठी आहे. कारण, या महिलेला गुगलवरील एका वेबसाइटवरून 'मूव्हर्स अँड पॅकर्स'चा कथित नंबर मिळाला होता.

    हेही वाचा: ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा; गुन्हेगारांनी एका ड्रायव्हरकडून भाड्यानं घेतली....

    आपल्यापैकी असे बरेचजण आहेत जे थेट गुगलवर जाऊन एखाद्या संस्थेचा, बँकेचा किंवा इतर आवश्यक नंबर शोधतात. उदाहरणार्थ, तुम्हाला बँकेचा नोएडा सेक्टर 18 शाखेचा क्रमांक मिळवायचा असेल, तर तुम्ही गुगलवर काय टाइप कराल? बहुतांश लोक बँकेचं नाव आणि पत्ता टाइप करून कस्टमर केअर नंबर शोधतील. अशावेळी, तुम्हाला अगोदर गुगल मॅपसह सर्च रिझल्ट दिसेल. हे फक्त बँकेच्याच नाही तर इतर कोणत्याही सेवेबाबत होऊ शकतं. गुगल मॅप्ससह दिसणार्‍या सर्च रिझल्टवर क्लिक करताच, एक डिटेल्ड पेज तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. डिटेल्ड पेजवर तुम्हाला नंबर आणि इतर तपशील दिसतील. पण, त्यासोबत सजेस्ट अँड एडिटचा पर्यायही उपलब्ध असतो.

    त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 'नाव बदला किंवा इतर तपशील बदला' या दोन पर्यायांसह 'बंद करा' किंवा 'काढून टाका' असे पर्यायदेखील दिसतात. पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला नाव, नंबर, वेबसाइट आणि इतर तपशील बदलण्याचा पर्याय मिळेल. याचा वापर करून स्कॅमर येथून कोणताही डेटा काढू शकतात आणि त्याठिकाणी बनावट डेटा टाकू शकतात. असं केल्यास जेव्हा कोणी ऑनलाइन नंबर शोधून कॉल करतो तेव्हा त्याचा कॉल स्कॅमरकडे जातो. अशा पद्धतीनं स्कॅमर्स लोकांची फसवणूक करतात.

    अशा प्रकारची फसवणूक कशी टाळावी?

    जर तुम्ही बँकेचा नंबर शोधत असाल तर संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच हा नंबर मिळवा. बँकेच्या अॅप्सवरही तुम्हाला हे तपशील सहज मिळतील. जर तुम्ही इतर कोणत्याही सेवेसाठी नंबर शोधत असाल, तर केवळ ऑथेंटिक सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी संपर्क साधा. गरज भासल्यास प्रत्यक्ष कार्यालयाला भेट द्या. स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा जास्त वापर करत आहेत. त्यामुळे तुम्ही ऑफलाइन मार्केटमध्ये जाऊन सर्व्हिस प्रोव्हायरशी संपर्क साधला तर फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता. याशिवाय, कोणत्याही अज्ञात वेबसाइटवरचे तपशील फॉलो करणं टाळलं पाहिजे.

    First published:

    Tags: Cyber crime, Financial fraud