मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /खाकी वर्दीतील माणुसकी! 5 वर्षीय बलात्कार पीडितेसाठी उभारला निधी; शाळेचीही केली व्यवस्था

खाकी वर्दीतील माणुसकी! 5 वर्षीय बलात्कार पीडितेसाठी उभारला निधी; शाळेचीही केली व्यवस्था

पोलीस

पोलीस

नागपाडा पोलिसांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रशांत बाग, प्रतिनिधी

मुंबई, 28 जानेवारी : रोजच्या आयुष्यात खून, मारामारी, अपघात, गुन्हेगारी अशा घडामोडी असल्याने अनेकदा पोलिसांच्या भावना मेल्यात की काय? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मात्र, पोलिसांच्या खाकीतही, एक अत्यंत संवेदनशील आणि कुटुंबवत्सल माणूस दडलेला असतो हेही कधीतरी समोर येतं. अशीच एक घटना घडली असून नागपाडा पोलिसांतील कर्तव्यदक्ष पोलीस आणि खाकीतला माणूस ठळकपणे समोर आला आहे.

कोणत्याही पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्ष आणि तिथे असलेला फोन वाजला की पोलीस सतर्क होतात. असाच एक फोन आला आणि एक भयानक घटना फोनवर समजली. अवघ्या 5 वर्षाची चिमुरडी एका नराधमाच्या वासनेची बळी झाली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांनी यंत्रणा कामाला लावली. तातडीनं पसार झालेल्या नराधमाला पकडण्यासाठी 5 टीम कामाला लागल्या. अत्यंत गरीब कुटुंबातील त्या चिमुरड्या पीडितेला तातडीनं वैद्यकीय उपचार सुरु केले. सलग 6 तासांच्या मेहनतीनं नागपाडा पोलिसांना यश मिळालं आणि तो नराधम जेरबंद झाला.

वाचा - गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधत असाल तर सावधान! होऊ शकते फसवणूक

शिक्षणाची जबाबदारीही पोलिसांनी उचलली

मात्र, मोठा मानसिक आघात झालेल्या त्या पीडितेच्या मानसिक जखमा फार खोल होत्या. खाकीतल्या या माणसांनी त्या चिमुरडीला आयुष्यात पुन्हा उभं करायचा निर्णय घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अगदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क निधी गोळा करायचा निर्णय घेतला. पाहता पाहता तब्बल 1 लाख 11 हजार रुपयांची रक्कम जमा झाली. या रकमेची पोलिसांनी FD केली. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेची, समाजातील अनेक घटकांनी नोंद घेतली. मदतीसाठी हात पुढे आले. दरम्यान, या अवघ्या 5 वर्षीय चिमुरडीच्या शिक्षणाची जबाबदारीही नागपाडा पोलिसांनी उचलली. एका चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळवून दिला. त्या नराधमाला कायद्यानं शिक्षा होईलच. मात्र, त्याच्या जखमांचे ओरखड्यांनी त्या चिमुरडीला आयुष्यभर त्रास झाला असता. विशेष म्हणजे या गोष्टीचा कोणताही गवगवा करण्यात आला नाही.

First published:

Tags: Crime, Mumbai police