JOIN US
मराठी बातम्या / करिअर / EPFO SSA आणि स्टेनोग्राफर्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; कधी आहे परीक्षा? नियम व अटी, सगळं पाहा एका क्लिकवर

EPFO SSA आणि स्टेनोग्राफर्स परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; कधी आहे परीक्षा? नियम व अटी, सगळं पाहा एका क्लिकवर

अॅडमिशन कार्ड्स परीक्षेच्या नियोजित तारखेच्या दोन ते तीन दिवस आधी उपलब्ध करून दिली जातील. एसएसएच्या माहिती पत्रिका ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्या जातील.

जाहिरात

EPFO SSA आणि स्टेनोग्राफर्स परीक्षेचं वेळापत्रक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै :  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (ईपीएफओ) सामाजिक सुरक्षा सहाय्यक (एसएसए) आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी ईपीएफओ लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते ईपीएफओच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर तपशीलवार वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेतली जाईल, तर एसएसए परीक्षा 18, 21 आणि 23 ऑगस्ट रोजी होईल. या भरती परीक्षांद्वारे एकूण 2859 एसएसए आणि स्टेनोग्राफर पदे भरली जाणार आहेत. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा (फेज-I) आणि कॉम्प्युटर टायपिंग टेस्टच्या (फेज-II) (सामान्यत: कॉम्प्युटर डेटा एंट्री टेस्ट म्हणून ओळखली जाते) निकालांचा उपयोग अर्जदार पुढील फेरीत जाण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरवण्यासाठी केला जाईल. ईपीएफओ एसएसए प्रीलिम्स परीक्षेत एकूण 600 गुणांसाठी, ऑनलाईन पद्धतीनं 150 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न सोडवण्यासाठी 2 तास 30 मिनिटांचा कालवधी दिला जाईल. हेही वाचा -  Bank Jobs: ‘या’ बँकेत होणार तब्बल 183 पदांसाठी बंपर भरती; पात्र असाल तर करा अर्ज ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर परीक्षेचं वेळापत्रक डाउनलोड कसं करावं? स्टेप 1: ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर भरतीच्या वेळापत्रकासाठी ईपीएफओच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2: परीक्षेच्या वेळापत्रकाची लिंक शोधण्यासाठी ‘नोटिफिकेशन टॅब’ निवडा. स्टेप 3: ईपीएफओ एसएसए आणि स्टेनोग्राफर शेड्युल लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: स्क्रीनवर PDF स्वरूपात परीक्षेचं वेळापत्रक दिसेल. स्टेप 5: परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी PDF वाचा. हेही वाचा -  BOB Recruitment 2023: बँक ऑफ बड़ौदामध्ये ‘या’ पदांसाठी भरतीची घोषणा; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक स्टेनोग्राफर पोस्टच्या माहिती पत्रिका 22 जुलै रोजी दिल्या जातील. अॅडमिशन कार्ड्स परीक्षेच्या नियोजित तारखेच्या दोन ते तीन दिवस आधी उपलब्ध करून दिली जातील. एसएसएच्या माहिती पत्रिका ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्या जातील. ईपीएफओ एसएसएची अॅडमिशन कार्ड्स 15 किंवा 16 ऑगस्ट 2023 रोजी उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. कारण, एसएसएचा पेपर 18 ऑगस्ट रोजी नियोजित आहे. स्टेनोची अॅडमिशन कार्ड्स 29 ते 30 जुलैदरम्यान कधीही उपलब्ध करून दिली जाऊ शकतात.

परीक्षेसंबंधी लेटेस्ट आणि अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी एनटीए वेबसाइटला वारंवार भेट दिली पाहिजे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढच्या प्रक्रियेतही उमेदवारांना पास व्हावं लागेल त्यानंतर संबंधित पदावर नोकरी करण्याची संधी त्यांना मिळू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या