JOIN US
मराठी बातम्या / करिअर / नोकरी आता बस्स, इंजिनिअर तरुणाने डोकं लावलं, आता महिन्याला कमावतो 4 लाख रुपये!

नोकरी आता बस्स, इंजिनिअर तरुणाने डोकं लावलं, आता महिन्याला कमावतो 4 लाख रुपये!

त्याने विदिशामध्ये राहून, याठिकाणी कोणत्या गोष्टीची कमी आहे, काय आहे, काय नाही याबाबत 6 महिने अभ्यास केला.

जाहिरात

सौरभ सोलंकी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवि कुशवाहा, प्रतिनिधी विदिशा, 25 जुलै : देशातील अनेक तरुण हे आपले शिक्षण पूर्ण करतात. यानंतर सरकारी किंवा खासगी नोकरीच्या शोध घेत असतात. या तरुणांना नोकरी हेच आपले करिअर वाटते. मात्र, काही तरुण असेही असतात जे स्वत:चा व्यवसाय सुरू करतात आणि त्यात यशस्वीसुद्धा होऊन दाखवतात. आज अशाच एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात. सौरभ सोलंकी असे या तरुणाचे नाव आहे. तो मध्यप्रदेश राज्याच्या विदिशा येथील रहिवासी आहे. सौरभने इंजिनिअरची नोकरी सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. या माध्यमातून तो आज लाखो रुपये कमवत आहेत. सौरभने सांगितले की, इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला नोकरी लागली. मात्र, नोकरीत त्याचे मन लागले नाही. मग त्याला आपणच स्वत:चा व्यवसाय करावा, अशी कल्पना सुचली. यानंतर त्याने विदिशामध्ये राहून, याठिकाणी कोणत्या गोष्टीची कमी आहे, काय आहे, काय नाही याबाबत 6 महिने अभ्यास केला. यानंतर त्याला वाटले की, याठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. मग ते का नाही आहे, याचा विचार त्याने केला. विदिशामध्ये स्वच्छ पाण्यासाठी कोणताही मिनरल वॉटर प्लांट नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने मिनरल वॉटर पॅकेजिंगचा कारखान सुरू केला. मग यातच तो पुढे जात राहिला.

250 किमी परिसर कव्हर करतात - सौरभने सांगितले की, विदिशामध्ये कोणताही मिनरल वॉटर प्लांट नसल्यामुळे याठिकाणी बाहेरुन पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, जेव्हा त्यांनी स्वत:चा हा कारखाना सुरू केला तेव्हा त्याच्या इथले हे पाणी विदिशा, सिरोंज, लटेरी, सागर, रायसेन, नटेरन, शमशाबाद, गैरतगंज, बैरासिया यासह अन्य ठिकाणीही पुरवले जाते. फक्त विदिशाच नाही तर तब्बल 250 किमी परिसरात ते मिनरल वॉटरचा पुरवठा करतात. प्रत्येक महिन्याला लाखोंची कमाई - सौरभने सांगितले की, जेव्हा त्याने हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्याला जास्त पैसे मिळत नव्हते आणि खर्चही जास्त होत होता. मात्र, हळूहळू त्याने मार्केटमध्ये मिनरल वॉटरचा पुरवठा करायला सुरुवात केली आणि आता ते दूरदूरपर्यंत त्यांच्या कारखान्यातील मिनरल वॉटरचाा पुरवठा करत आहेत. त्यामुळे या माध्यमातून आता ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपये कमावतात. सौरभची ही मेहनत प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या