JOIN US
मराठी बातम्या / करिअर / देशाच्या संरक्षणासाठी रिसर्च करण्याची सर्वात मोठी संधी; DRDO मध्ये 'या' पदांसाठी पदभरतीची घोषणा

देशाच्या संरक्षणासाठी रिसर्च करण्याची सर्वात मोठी संधी; DRDO मध्ये 'या' पदांसाठी पदभरतीची घोषणा

डीआरडीओनं इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या आपल्या प्रीमिअर लॅबोरेटरीमध्ये तात्पुरत्या आधारावर ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

जाहिरात

DRDO

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली प्रमुख एजन्सी आहे. 1958 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. 52 प्रयोगशाळांच्या नेटवर्कसह डीआरडीओ ही भारतातील सर्वांत मोठी आणि सर्वांत वैविध्यपूर्ण संशोधन संस्था आहे. या ठिकाणी एरोनॉटिक्स, शस्त्रास्त्रं, इलेक्ट्रॉनिक्स, लँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग, लाईफ सायन्सेस,मटेरिअल्स, मिसाईल्स आणि नेव्हल सिस्टिम्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य चालतं. या कामासाठी या संस्थेला निष्णात कर्मचाऱ्यांची गरज भासते. आता डीआरडीओनं इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या आपल्या प्रीमिअर लॅबोरेटरीमध्ये तात्पुरत्या आधारावर ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. डीआरडीओच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे जेआरएफपदासाठी फक्त एक जागा रिक्त आहेत. ‘स्टडी कॅफे’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘ते’ नुसते दिसले तरी थरथर कापतात गुन्हेगार; आतापर्यंत तब्बल 60 एन्काऊंटर केलेले IPS आहेत तरी कोण? पोस्टचं नाव आणि संख्या: डीआरडीओच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, डीआरडीओनं इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) या प्रीमिअर लॅबोरेटरीमध्ये तात्पुरत्या आधारावर जेआरएफ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. जेआरएफपदासाठी फक्त एका जागा रिक्त आहे. कार्यकाळ: एकूण पाच वर्षांच्या काळासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. सुरुवातीचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असेल आणि त्यानंतर उर्वरित तीन वर्षांसाठी डीआरडीओ मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूल्यांकन करून उमेदवाराला एसआरएफ म्हणून प्रमोट केलं जाईल. जाड पिळदार मिश्या आणि दबंग पर्सनॅलिटी, ‘Iron Man’ म्हणून ओळखले जातात ‘हे’ IPS Officer, गिनीज बुकमध्येही आहे नाव शैक्षणिक पात्रता: जेआरएफ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग. (ईसीई), इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग. (ईटीसी), इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग (ई&आय), अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग (ए, ई & आय) या पैकी एका शाखेची पदवी मिळवलेली असावी. पगार: डीआरडीओमध्ये जेआरएफ पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवाराला 31 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळेल. CIDCO Recruitment 2023: महिन्याचा तब्बल 2 लाखांहून अधिक पगार आणि बऱ्याच सुविधा; वेळ घालवू नका; करा अप्लाय निवड प्रक्रिया: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीची पद्धत/तारीख/वेळ या संबंधी निवडलेल्या उमेदवारांना एसएमएस/ई-मेल पाठवला जाईल.

अर्ज कसा करावा: डीआरडीओच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रं आणि अनुभवाच्या सेल्फ-अटेस्टेड प्रतींसह अर्ज भरू शकतात. अर्ज करताना उमेदवारांनी ब्लॉक लेटर्समध्ये Application for the post of JRF असा विषय नमूद करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी त्यांचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं एकाच पीडीएफमध्ये सबमिट केला पाहिजे. त्या पूर्वी टाईप केलेल्या अर्जावर सही करून तो स्कॅन केलेला असावा. हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 26.04.2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या