DRDO भरती 2023
मुंबई, 12, जून: संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली प्रमुख एजन्सी आहे. 1958 मध्ये तिची स्थापन करण्यात आली. 52 प्रयोगशाळांच्या नेटवर्कसह डीआरडीओ ही भारतातील सर्वांत मोठी आणि सर्वांत वैविध्यपूर्ण संशोधन संस्था आहे. या ठिकाणी एरोनॉटिक्स, शस्त्रास्त्रं, इलेक्ट्रॉनिक्स, लँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग, लाईफ सायन्सेस, मटेरिअल्स, मिसाईल्स आणि नेव्हल सिस्टिम्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य चालतं. या कामासाठी या संस्थेला निष्णात कर्मचाऱ्यांची गरज भासते. आता डीआरडीओनं डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स नावाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर) प्रिमिअर लॅबोरेटरीमध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी नवोदितांना संधी देऊ केली आहे. डीआरडीओनं इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून (पदवीधर, डिप्लोमा आणि आयटीआय) अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
इच्छुक उमेदवार drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज सादर करण्यासाठी, एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 20 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबतची जाहिरात 10 जून रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच 30 जून 2023 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
Success Story: वयाच्या 14व्या वर्षी हजारो डॉलर्सची सॅलरी? त्याच्या टॅलेंटनं एलॉन मस्कला लावलं वेड; थेट SpaceX मध्ये जॉबज्या उमेदवारांनी 2020, 2021 आणि 2022 मध्ये ग्रॅज्युएशन, डिप्लोमा आणि आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिसच्या पात्रता परीक्षा दिल्या आहेत, तेच अर्ज करण्यास पात्र आहेत.
डीआरडीओ अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज कसा करावा?
- drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवरील ‘व्हॉट्स न्यू’ सेक्शनवर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक नवीन पेज डिस्प्ले होईल.
- RCI, DRDO, हैदराबाद पदवीधर, तंत्रज्ञ आणि आयटीआय ट्रेड अॅप्रेंटिसच्या जाहिरातीवर क्लिक करा.
- नोंदणी करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
- आवश्यक शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- भविष्यातील गरजेसाठी अर्जाची प्रिंट आउट काढा.
UPSC Prelims Result 2023: UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल अखेर लागला; असा चेक करा तुमचा रिझल्टडीआरडीओमध्ये 5000पेक्षा जास्त शास्त्रज्ञांसह एकूण 25000 मनुष्यबळ आहे. या सर्वांनी मिळून आत्तापर्यंत लढाऊ विमानं, रॉकेट, कमी पल्ल्याच्या बंदुका, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रं, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणं विकसित केली आहेत. अॅप्रेंटिसशिपच्या निमित्तानं जास्तीत जास्त तरुणांना अशा संस्थेत काम करण्याची संधी दिली जात आहे.