मुंबई, 12, जून: तुमचं वय अवघं 14 वर्षं होतं तेव्हा तुम्ही काय करत होते? हा प्रश्न बघताच तुमचं पहिलं उत्तर असेल “काही खास नाही”. कारण आपल्यापैकी बहुतेक लोकांनी चौदाव्या वर्षी दहावीही पास केलं नसेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलाची गोष्ट सांगणार आहोत जो चौदाव्या वर्षी चक्क ग्रॅज्युएट होणार आहे. इतकंच नाही तर एलोन मस्कच्या स्पेसेक्स कंपनीमध्ये त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीही मिळणार आहे. असा हा मुलगा आहे तरी कोण? जाणून घेऊया. ज्या वयात आपल्याला व्यवहार ज्ञानही नसतं त्या वयात एक मुलगा इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. कॅरेन काझी असं या मुलाचं नाव आहे. जो फक्त 14 वर्षांचा आहे. कॅरेन काझी हा SpaceX मधील सर्वात तरुण कर्मचारी आहे. अलीकडेच त्याला इलॉन मस्कने त्याच्या स्टारलिंक अभियांत्रिकी संघासाठी नियुक्त केलं आहे. कॅरेन काझी सांता क्लारा युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवीचे शिक्षण घेत आहे. SpaceX सह त्याच्या नवीन प्रवासाची घोषणा करताना, काझीने LinkedIn प्लॅटफॉर्मवर नोकरीचं अपडेट शेअर केलं. त्याने ‘टेक्निकली चॅलेंजिंग फन’ मुलाखत प्रक्रिया क्लिअर केली आहे. UPSC Prelims Result 2023: UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल अखेर लागला; असा चेक करा तुमचा रिझल्ट “लवकरच मी स्टारलिंक अभियांत्रिकी संघात सामील होणार आहे. ही पृथ्वीवरीलस र्वात छान कंपनी आहे. स्पेसएक्स ही त्या दुर्मिळ कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी क्षमता आणि परिपक्वतासाठी वयानुसार आणि अनियंत्रित बेंचमार्कचा विचार करत नाही” असं कॅरेन काझी यांनी म्हंटलं आहे. कॅरेन काझी असेल सर्वात तरुण पदवीधर कॅरेन काझी यानं पदवीपूर्व शिक्षणापूर्वी SpaceX मध्ये सामील होण्याच्या यशाची माहिती शेअर केली आहे. तो सांता क्लारा विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवीधर आहे. काझी हा या विद्यापीठातील सर्वात तरुण पदवीधर असतील. Success Story: फी भरण्यासाठीही नव्हते पैसे, वडील किडनी विकण्यासाठी होते तयार, पण मुलानं करून दाखवलं; झाले IPS वयाच्या नवव्या वर्षी प्रवासाला सुरुवात केली काझी वयाच्या नऊव्या वर्षी तिसर्या वर्गात असताना त्याला असं आढळलं की शाळेचं काम पुरेसे आव्हानात्मक नव्हते. त्यानंतर त्यांनी एआय रिसर्च को-ऑप फेलो म्हणून इंटेल लॅब्सा येथे इंटर्नशिप सुरू केली. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्याने सायबर इंटेलिजन्स फर्म Blackbird.AI येथे चार महिने मशीन लर्निंग इंटर्न म्हणून काम केलं. कॅरेन काझीला तिच्या फावल्या वेळात, आर्थिक संकटात माहिर असलेल्या पत्रकार मायकेल लुईसचे काम, फिलिप के डिकच्या ऍसॅसिन्स क्रीड मालिका आणि विज्ञान कथा यासारखे गेम खेळणे आवडते.
किती असेल कॅरेनची सॅलरी कॅरेनची स्पेसेक्समध्ये सॅलरी नक्की किती असेल याची अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. मात्र स्पेसेक्सच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्याला ही हजारो डॉलर्सची सॅलरी दिली जाईल अशी माहिती काही रिपोर्ट्सकडून मिळाली आहे.