दूरसंचार विभागात जॉबची सर्वात मोठी संधी
मुंबई, 03 मे: आपल्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात दूरसंचार सेवांना महत्त्वाचं स्थान आहे. भारतीय दूरसंचार विभाग दूरसंचार सेवांच्या वेगवान वाढीसाठी विकासात्मक धोरणं तयार करत आहे. हा विभाग आंतरराष्ट्रीय संस्थांशी जवळून समन्वय साधून रेडिओ कम्युनिकेशन क्षेत्रातील फ्रीक्वेन्सी मॅनेजमेंटसाठी जबाबदार आहे. या कामासाठी दूरसंचार विभागाला कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे. त्यामुळे भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयातील दूरसंचार विभागानं डायनॅमिक आणि कमिटेड तरुणांना नोकरीची संधी देऊ केली आहे. दूरसंचार विभागानं यंग प्रोफेशनल्स पदाच्या 30 रिक्त जागा कराराच्या आधारावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विभागानं इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. दूरसंचार विभाग 2023 भरती अधिसूचनेनुसार 19 एप्रिल 2023 पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दूरसंचार विभाग 2023 भरती अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशनलपदी निवड झालेल्या उमेदवारांना 70 हजार रुपये मासिक वेतन मिळेल. निवड झालेल्यांचा सुरुवातीचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असेल. मात्र, उमेदवाराचं एका वर्षातील काम आणि वर्तणूक बघून हा कार्यकाळ जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. यंग प्रोफेशनल पदावर काम करण्यासाठी इच्छुक आणि पात्र तरुण 12 मे 2023 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज दाखल करू शकतात. पोस्ट आणि त्यांची संख्या: दूरसंचार विभागानं ‘यंग प्रोफेशनल्स’ पदाच्या 30 रिक्त जागा कराराच्या आधारावर भरण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्यांचा सुरुवातीचा कार्यकाळ फक्त एक वर्षाचा असेल. मात्र, उमेदवाराचं एका वर्षातील काम आणि वर्तणूक बघून हा कार्यकाळ जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. Success Story: कधीकाळी वडीलांचा होता हातठेला अन् मुलानं उभी केली तब्बल 400 कोटींची कंपनी कॅटेगरीनुसार पोस्टची संख्या: I) कॅटेगरी A: 22 जागा, II) कॅटेगरी B: 2 जागा III) कॅटेगरी C: 3 जागा आणि कॅटेगरी D: तीन जागा. मासिक मानधन: दूरसंचार विभाग 2023 भरती अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशनलपदी निवड झालेल्या उमेदवारांना 70 हजार रुपये मासिक वेतन मिळेल. वयोमर्यादा: यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 19 एप्रिल 2023 पर्यंत 32 वर्षांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. फ्रेशर्स उमेदवारांसाठी मोठी खूशखबर! ‘ही’ मोठी IT कंपनी येत्या वर्षी 15,000 जणांना देणार नोकरी पात्रता: कॅटेगरी Aसाठी शैक्षणिक पात्रता: पोस्ट-संबंधित विषयात बॅचलर डिग्री किंवा पोस्ट-ग्रॅज्युएट डिग्री. कॅटेगरी Bसाठी शैक्षणिक पात्रता: एमबीए/सीए/आयसीडब्ल्यूए/सीएफए कॅटेगरी C साठी शैक्षणिक पात्रता: कायद्याची बॅचलर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा मास्टर ऑफ लीगल लॉ आवश्यक कॅटेगरी D साठी शैक्षणिक पात्रता: ऑपरेशन्स रिसर्चमध्ये स्पेशलायझेशनसह इकॉनॉमिक्स/स्टॅटिस्टिक्स/एमबीए या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन. BMC Recruitment: 1,00,000 रुपये..हो, इतका मिळेल महिन्याचा पगार; मुंबई महापालिकेत बंपर भरती; करा अप्लाय अनुभव: सरकारी, नामांकित संस्था आणि संशोधन संस्थांमध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असला पाहिजे. प्रकाशित कार्य/पॉलिसी पेपर्स मूल्यांकन/प्रकल्प आणि योजनांचं निरीक्षण इत्यादींसह दूरसंचार क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल. नोट: इंटर्नशीप किंवा ट्रेनिंग अनुभव म्हणून ग्राह्य धरलं जाणार नाही. आधी नॉक करावं की आधी दार उघडावं? मुलाखतीच्या रूममध्ये जाताना कसं बनेल पहिलं इम्प्रेशन? या घ्या टिप्स निवड प्रक्रिया: निवड प्रक्रियेसाठी एक सिलेक्शन पॅनेल तयार केलं जाईल. हे पॅनेल मुलाखतींचा समावेश असलेली निवड प्रक्रिया पार पाडेल. सिलेक्शन पॅनेल प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे किंवा एका सामायिक प्लॅटफॉर्मवर, ठरवलेल्या निकषांनुसार एकूण 100 गुणांपैकी काही गुण देईल. कराराचा काळ: निवड झालेल्या उमेदवाराचा सुरुवातीचा कार्यकाळ फक्त एक वर्षांचा असेल. मात्र, उमेदवाराचं एका वर्षातील काम आणि वर्तणूक बघून हा कार्यकाळ जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. Success Story: वडिलांना होता कँसर तरीही त्यांनी नाही मानली हार; अवघ्या 22व्या वर्षी झाल्या IAS अर्ज कसा करावा: दूरसंचार विभाग 2023 भरती अधिसूचनेनुसार, श्रेणीनिहाय पोस्टमध्ये स्वारस्य असलेल्या पात्र व्यक्तींनी त्यात नमूद केलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.