शिक्षण फ्री..फ्री..फ्री
मुंबई, 24 ऑगस्ट: ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्त्न केले जात आहेत. जास्तीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्किल्स कोर्सेस (Skill courses online) करून साक्षर आणि स्किल्ड व्हावं हा यामागचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ऑनलाइन शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) आवश्यक नियमावली अधिसूचित केली आहे. ज्यामध्ये विद्यापीठांना संपूर्ण ऑनलाइन प्रोग्राम ऑफर करण्याची सुविधा मिळणार आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना कोर्सेस Online करता येणार आहेत. UGC ने SWAYAM (Study Webs of Active Learning for Young Aspiring Minds) रेग्युलेशन्स, 2021 (SWAYAM Regulations 2021) द्वारे ऑनलाइन लर्निंग कोर्सेससाठी क्रेडिट फ्रेमवर्क तयार केलं आहे. यानुसार एका सेमिस्टरमध्ये एका विशिष्ट प्रोग्राममध्ये ऑफर केल्या जाणार्या एकूण अभ्यासक्रमांपैकी 40% अभ्यासक्रम हा ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे. SWAYAM द्वारे ही ऑनलाईन कोर्स (SWAYAM Online courses) घेतले जाणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन कोर्सेस करू इच्छिणाऱ्या किंवा पार्ट टाइम कोर्सेस (Part Time Courses) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. परीक्षेत टेन्शन न घेता टॉपर व्हावं असं वाटतंय? मग पालक म्हणून टाळा या गोष्टी
यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना त्यांचे ४०% अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याची परवानगी दिली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यापीठे स्वयंम (SWAYAM) पोर्टल वापरणार आहेत. हे पोर्टल मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहे. या अंतर्गत विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम तसेच पोर्टलवर अभ्यास करू शकतात. येथे मिळालेले गुणही पदवीमध्ये जोडले जाणार आहेत.
काय आहे स्वयं पोर्टल जेव्हा भारत सरकारने फेब्रुवारी 2017 मध्ये SWAYAM पोर्टल लाँच केले तेव्हा त्याचे उद्दिष्ट इयत्ता 9 वी ते पदव्युत्तर शिक्षण पूर्णपणे मोफत करणे हे होते. हे पोर्टल मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालवले जाते. या पोर्टवर एकाच वेळी 2100 हून अधिक अभ्यासक्रम शिकविले जाऊ शकतात आणि 1000 हून अधिक शिक्षकांना या पोर्टलवर सहकार्य मिळणार आहे. पोर्टलवर व्हिडिओ व्याख्याने, वाचन साहित्य, स्वयं-मूल्यांकन चाचणी आणि चर्चा पूर्णपणे ऑनलाइन आहेत. AICTE, UGC, NPTEL, NCERT, CEC, NIOS, IGNOU, IIM बंगलोर, NITTTR यांना कोर्ससाठी चांगली सामग्री देण्यासाठी नॅशनल कोऑर्डिनटोर बनवण्यात आलं आहे. इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा Apply
असं घेता येईल शिक्षण
पोर्टलवर कला, विज्ञान, मानविकी, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कायदा, व्यवस्थापन कृषी यासह अनेक विषयांचे अभ्यासक्रम आहेत. यासाठी https://swayam.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आवडीच्या अभ्यासक्रमात नावनोंदणी करावी लागेल.