मुंबई, 23 ऑगस्ट: आजकालच्या काळात प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी सर्वच क्षेत्रात यश मिळवावं असं वाटत असतं. मात्र यासाठी पालक काहीही करायला तयार असतात. अनेकदा आपल्या मुलांना चांगला वागावं किंवा त्यांना यश मिळावं म्हणून पालक मुलांना चुकीची वागणूक देतात. तसंच मुलांना वाईट गोष्टी शिकवून अप्रत्यक्षपणे मुलांना बिघडवतात. पण तुम्हालाही तुच्या मौलांनी सतत यश मिळवावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत वागताना बोलताना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुलांशी कसं वागावं कसं वागू नये (things to do with Children) हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. लोकांसमोर मुलांना रागावू नका मुलांनी चूक केली तर त्यांना नेहमी रागवलं जातं आणि समजावलं जातं. पण नुसतं समजवून सांगण्यात आणि रागवण्यात फरक आहे. काहीवेळा जेव्हा पालक काही लोकांच्या उपस्थितीत एखाद्या गोष्टीसाठी मुलाला रागवतात तेव्हा तो एकतर ऐकत नाही किंवा तो शांतपणे रडतो कारण त्याला लोकांसमोर लाज वाटते. यामुळे तुमची मुलं देखील नैराश्यात जाऊ शकतात. त्यामुळे मुलांना कधीच लोकांसमोर रागावू नका. क्या बात है! आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घेता येईल शिक्षण मुलांना कोणतंच आमिष दाखवू नका जर पालक मुलाला अभ्यासासाठी लाच देत असतील तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. कोणतेही काम करून घेण्यासाठी मुलांना अनेकदा आईस्क्रीम, चॉकलेट्स किंवा खेळण्यांचे आमिष दाखवले जाते. यानंतर ते नीट वागण्याऐवजी त्यांच्या मागण्या तुमच्याकडून पूर्ण करून घेत राहतील आणि त्यांची सवय बिघडेल. आणि मागणी पूर्ण केल्याशिवाय त्यांचा नीट अभ्यास होणार नाही. ओव्हर रिऍक्ट करू नका कोणत्याही कारणास्तव मुलाचे गुण कमी झाले तर त्यांना सहानुभूती देऊन चांगला अभ्यास करून पुढच्या वेळी चांगले गुण मिळवण्यास प्रवृत्त करा. अशा परिस्थितीत मुलांच्या कोणत्याही छोट्याशा चुकीवर पालक जोरात ओरडायला लागले किंवा अति-प्रतिक्रिया देऊ लागले तर ती मोठी चूक मानली जाते. कारण मुलांशी जर ओरडून बोलले गेले तर ते ऐकण्याऐवजी ते एकतर ओरडूनच वागू लागतात किंवा ते बोलणेच ऐकणे सोडून देतात. डेटा सायन्स ते सायबर सेक्युरिटी देशातील टॉप IIT मध्ये तरुणांसाठी बेस्ट कोर्सेस मुलांची शिकण्याची शैली समजून घ्या आपल्या पाल्याचा अभ्यास कसा होईल हे कोणत्याही पालकाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे काहीही लक्षात ठेवण्याची क्षमता आहे. तो बोलून किंवा लिहून आठवत असला तरी तो पटकन लक्षात राहतो.हे एकदा समजून घेतलं की मुलाला शिकवणं सोपं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.