मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती; 'या' तारखेपर्यंत लगेच करा अप्लाय

मोठी बातमी! इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती; 'या' तारखेपर्यंत लगेच करा अप्लाय

JEE Mains च्या मार्कांवर भरती

JEE Mains च्या मार्कांवर भरती

विशेष म्हणजे ही पदभरती ही JEE Mains च्या मार्कांच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे JEE Mains मध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांना इंडियन आर्मीत नोकरीचा (Indian Army Jobs by JEE Mains) गोल्डन चान्स मिळणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 ऑगस्ट: इंडियन आर्मीमध्ये जॉब करू इच्छिणाऱ्या बारावीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आहे. भारतीय सैन्याच्या 10+2 Technical Entry Scheme (TES) - 48 अंतर्गत लवकरच नव्वद पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे ही पदभरती ही JEE Mains च्या मार्कांच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे JEE Mains मध्ये चांगले मार्क्स आहेत त्यांना इंडियन आर्मीत नोकरीचा (Indian Army Jobs by JEE Mains) गोल्डन चान्स मिळणार आहे.

या पद्भारतीसाठी जे उमेदवार पात्र आहेत ते joinindianarmy.nic.in या लष्कराच्या अधिकृत साइटद्वारे अर्ज करू शकतात. 22 ऑगस्टपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी असणार आहे.

क्या बात है! आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घेता येईल शिक्षण

इंडियन आर्मीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण 90 रिक्त पदं भरण्यासाठी भरती घेण्यात येत आहे, ही भरती तात्पुरती असणार आहे. तसंच या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण अकादमीमधील प्रशिक्षण क्षमतेनुसार बदलल्या जाऊ शकतात. एकदा, चार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, कॅडेट्सना लष्करात लेफ्टनंट पदासाठी कायमस्वरूपी कमिशन दिलं जाणार आहे.

ही शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) मध्ये 10+2 परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किमान एकूण 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

विविध राज्य/केंद्रीय बोर्डांच्या पीसीएम टक्केवारीची गणना करण्यासाठी पात्रता अट केवळ बारावीच्या वर्गात मिळालेल्या गुणांवर आधारित असेल असं सैन्यानं सांगितलं आहे.

उमेदवार JEE Mains परीक्षा दिली असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय हे 16 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि 19 वर्षांपेक्षा जास्त नसावं.

अशी असेल निवड प्रक्रिया

अर्जदारांची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारे दोन टप्प्यात केली जाईल. निवडलेल्या व्यक्तींना मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाईल. “अंतिम गुणवत्ता यादी प्री-कमिशनिंग ट्रेनिंगसाठी इंडक्शन करण्यापूर्वी डायरेक्टरेट जनरल ऑफ रिक्रूटिंग वेबसाइट www.joinindianarmy.nic.in वर पब्लिश केली जाणार आहे.

ना कोणती परीक्षा, ना कुठली ऑनलाईन टेस्ट; राज्यातील 'या' कॉलेजमध्ये मिळेल थेट नोकरी; हा घ्या मुलाखतीचा पत्ता

अर्ज करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सुरुवातीला joinindianarmy.gov.in या अधिकृत साइटवर जा

होमपेजवर उपलब्ध असलेल्या 'Apply Online ' लिंकवर क्लिक करा.

TES-48 प्रवेश योजनेसाठी नोंदणी करा.

आता अर्जात विचारलेले तपशील द्या.

अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

फॉर्म डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी तयार करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Indian army, Job, Jobs Exams