JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: 12वीनंतर लाखो रुपये पगार असणारी नोकरी हवीये? मग 'हे'कोर्सेस कराच

Career Tips: 12वीनंतर लाखो रुपये पगार असणारी नोकरी हवीये? मग 'हे'कोर्सेस कराच

बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरसाठी उपयुक्त ठरतील, अशा काही कोर्सची माहिती घेऊ या.

जाहिरात

'हे'कोर्सेस कराच

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 एप्रिल: आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दहावी, बारावीला तर पालक खूप महत्त्व देतात. कारण दहावी, बारावीचे गुण हे करिअरला दिशा देणारे असतात. बारावीनंतर करिअरची निवड करताना अनेकदा गोंधळ होतो. सध्या उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या विविध राज्यांमध्ये बारावीचा निकाल जाहीर झालाय. अद्याप सीबीएसई, तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्य मंडळांचे निकाल येणं बाकी आहे; मात्र बारावीनंतर मुलाला कोणत्या कोर्सला घालावं, कोणत्या क्षेत्रातलं करिअर चांगलं ठरेल, असे अनेक प्रश्न निकाल लागण्यापूर्वीच पालकांच्या मनात असतात. बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरसाठी उपयुक्त ठरतील, अशा काही कोर्सची माहिती घेऊ या. ते विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरू शकतील. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी मॅनेजमेंट डिप्लोमा, टॅली, टीआरपी, ई-कॉमर्स बँकिंग, कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, रिटेल मॅनेजमेंट डिप्लोमा कोर्स करू शकतात. याशिवाय पब्लिक रिलेशन अर्थात जनसंपर्क क्षेत्रात जाण्याचे पर्यायही विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. याशिवाय, विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करून मीडिया क्षेत्रातही चांगलं करिअर करू शकतात.

सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर : फायनान्सची समज असलेले विद्यार्थी बारावीनंतर सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर बनू शकतात. यानंतर, ते पर्सनल फायनान्स ते वेल्थ मॅनेजमेंट आणि विमा क्षेत्रात करिअर करू शकतात. मॅनेजमेंट स्टडीज : बारावीनंतर मॅनेजमेंट स्टडीज कोर्स करणं शक्य आहे. यामध्ये करिअरचे अनेक पर्याय आहेत. या अभ्यासक्रमामुळे व्यवस्थापनाबरोबरच नेतृत्वाचा दर्जाही विकसित होतो. आधी नॉक करावं की आधी दार उघडावं? मुलाखतीच्या रूममध्ये जाताना कसं बनेल पहिलं इम्प्रेशन? या घ्या टिप्स कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट : बारावीनंतर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट कोर्स करून करिअर सुरू करता येते. यामध्ये मॅनेजमेंट आणि अकाउंटिंगसोबत कमर्शियल फंडामेंटल आणि कायद्याचं ज्ञानही मिळतं. बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स : बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स कोर्सला सध्या खूप मागणी आहे. हा तीन वर्षांचा कोर्स आहे. यामध्ये अर्थशास्त्र, वित्त आणि विश्लेषण पद्धती शिकवल्या जातात. कॉलेजचं शिक्षण घेतानाच पैसे कमवायचे आहेत? मग ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स तुमच्यासाठी बेस्ट; हजारोंची कमाई चार्टर्ड अकाउंटंट : चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी हे कॉमर्स शाखेतले सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून ओळखले जातात. यामध्ये पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. बीबीए : बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन कोर्स केल्यानंतर विद्यार्थी एमबीए करू शकतात. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले कोणत्याही शाखेतले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. यामध्ये व्यवसाय आणि कॉर्पोरेट व्यवस्थापनाची समज विकसित होते. फक्त 25 रुपये भरून लाखो रुपये पगार असणारे सरकारी अधिकारी होण्याची संधी; इथे लगेच करा अर्ज बी.कॉम : बी. कॉम हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये बारावी सायन्स किंवा कॉमर्स शाखेचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. बीकॉमनंतर एमकॉम करता येतं. यामध्ये अकाउंट्स, स्टॅटिस्टिक्स, मॅनेजमेंट आणि ह्यूमन रिसोर्सेस हे विषय शिकवले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या