आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑप्शन
राज्य महामंडळाच्या परीक्षा संपल्या आहेत. या शिवाय सीबीएसई व इतर बोर्डांच्याही परीक्षा संपल्या असल्याने विद्यार्थी परीक्षेच्या निकालांकडे डोळे लावून बसले आहेत. परीक्षांचे निकाल आल्यावर कोणत्या फिल्डमध्ये करिअर करायचं, याचा विचारही अनेक जण करत आहेत. काहींची त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. 12 वी पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअर करण्यासाठी कोणकोणते ऑप्शन्स आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न येतात. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलं आहे.
इतर फिल्ड्सच्या तुलनेत आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना करिअरबद्दलचे प्रश्न जास्त सतावत असतात. कोणत्या कोर्समध्ये प्रवेश घेतल्यास नोकरीच्या संधी जास्त असतील? याचा ते सातत्याने विचार करत असतात. आर्ट्समधील शिक्षणानंतर उपलब्ध सर्वांत चांगल्या पर्यायांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पर्यायांमुळे तुम्हाला कोणत्या कोर्ससाठी अॅडमिशन घ्यावं आणि त्यानंतर नोकरीच्या संधी कोणत्या असतील, याबद्दल स्पष्टता येईल.
12 वी कला शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी बीए एलएलबी अभ्यासक्रम करू शकतात. हा अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे. बीए, एलएलबी केल्यानंतर विद्यार्थी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात किंवा स्थानिक कोर्टात प्रॅक्टिस करू शकतात. याशिवाय बीए, एलएलबी करून विद्यार्थी लीगल अॅडव्हायजर बनू शकतात. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये इंडिग्रेटेड बीए, एलएलबीचा कोर्स उपलब्ध आहे. या शिवाय विद्यार्थी CLAT ची परीक्षाही देऊ शकतात. या परीक्षेत यशस्वी झालेल्यांना नॅशनल लॉ कॉलेजेसमध्ये प्रवेश दिला जातो.
75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; ‘या’ महापालिकेत थेट मिळणार नोकरी; ही घ्या मुलाखतीची तारीखबारावी कला शाखेचे विद्यार्थी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन म्हणजे बीसीए करून करिअर करू शकतात. उत्तीर्ण झाल्यावर ते कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी करू शकते. अनेक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये बीसीए अभ्यासक्रम चालविला जातो. तिथून प्लेसमेंटही सहज होते आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात.
Indian Army Recruitment: सैन्यात नोकरीची ही संधी सोडू नका; ‘या’ जागांसाठी भरतीची मोठी घोषणाकला शाखेचे विद्यार्थी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा कोर्स करू शकतात. हा अभ्यास करून कॉलेजमधून उत्तीर्ण होताच त्यांना सहज नोकरी मिळते. अलाहाबाद विद्यापीठ, डीयूसह अनेक ठिकाणी हा कोर्स आहे. अधिक माहिती संबंधित विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासा.
12वी कला शाखेत शिकणारे विद्यार्थी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्लस एलएलबी कोर्स करू शकतात. कोर्स केल्यानंतर, लीगल अॅडव्हायजर म्हणून नोकरी मिळू शकते.
कला शाखेचे विद्यार्थी बीबीए प्लस एमबीएचा इंटीग्रेटेड कोर्स करू शकतात. हा कोर्स 5 वर्षांचा आहे. हा कोर्स केल्यानंतर मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये उमेदवारांची प्लेसमेंट सहज होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित कॉलेजच्या वेबसाइटवर पाहू शकतात.
हॉटेल मॅनेजमेंटमध्येही विद्यार्थी करिअर करू शकतात. सध्याच्या काळात लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सुरक्षिततेपासून ते फूड मेंटेनन्सपर्यंतची लोकांची गरज भासते. कला शाखेतून 12 वी शिकणारे उमेदवार हा अभ्यासक्रम करून चांगला पगार मिळवू शकतात.
फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून विद्यार्थीही उत्तम करिअर करू शकतात. यासाठी ते NIFT ची परीक्षा देऊ शकतात. या अंतर्गत देशातील नॅशनल फॅशन डिझायनिंग कोर्सेसमध्ये प्रवेश दिला जातो. या शिवाय अनेक विद्यापीठं आणि इतर संस्थांमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्सही करता येतो.
विद्यार्थ्यांना खेळाची आवड असेल तर ते बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन कोर्स करू शकतात. B.P.Ed सह इतर अनेक अभ्यासक्रम यात आहेत. अलाहाबाद विद्यापीठ, दिल्ली, जेएनयूसह अनेक विद्यापीठांमध्ये हा कोर्स शिकवला जातो.
थ्रीडी अॅनिमेशन आणि पेंटिंग इत्यादी अभ्यासक्रम करून विद्यार्थी करिअर करू शकतात. अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये हा कोर्स आहे. या संदर्भात अधिक माहिती विद्यापीठांच्या वेबसाइटवर मिळेल.
बॅचलर ऑफ फाइन आर्टचा कोर्स करूनही विद्यार्थी करिअर करू शकतात. फाइन आर्ट्समध्ये पेंटिंग तयार करणं शिकवलं जातं. हा कोर्स अलाहाबाद विद्यापीठ आणि इतर ठिकाणीही उपलब्ध आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही नोकरी न करता स्वतःचे काम करून लाखो रुपये कमवू शकता.