राजकारण आणि शिक्षण यांचा 36 चा आकडा आहे असं अनेक लोक बोलत असतात. अनेक राजकारणी शिकलेले नसतात असंही म्हणतात.
पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप राजकारण्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी टॉप शिक्षण घेतलं आहे.
पी चिदंबरम यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये हार्वर्ड विद्यापीठ (यूएसए) मधून एमबीए, मद्रास विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी आणि मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बीएससी यांचा समावेश आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील नफिल्ड कॉलेजमधून डी. फिल, पंजाब विद्यापीठातून बीए इकॉनॉमिक्स यांचा समावेश आहे.
शशी थरूर यांची शैक्षणिक सर्वोच्च पात्रता टफ्ट्स विद्यापीठातून M.A, M.A.L.D आणि Ph.D, दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून B.A इतिहासापासून सुरू होते.
कपिल सिब्बल यांनी यूएसए मधील हार्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम, दिल्लीच्या कॅम्पस लॉ युनिव्हर्सिटीमधून एलएलबी, दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून एमए इतिहास,केले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिष्ठित दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि अर्थशास्त्र विषयात हार्वर्ड विद्यापीठात गेले. त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूलमधून एमबीए केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी हिंदू कॉलेजमधून गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ISI, कोलकाता येथून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली.
सुरेश प्रभू यांनी The Institute of Chartered Accountants of India मधून A.L.B आणि बॉम्बे विद्यापीठातून B.Com केले आहे.