ही घ्या IMP प्रश्नांची यादी Video
मुंबई, 11 फेब्रुवारी: या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच घेतल्या जातील असं राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच परीक्षांचा टाइम टेबलही जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येण्यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांना सराव करावा लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला परीक्षेत कामी येणाऱ्या अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही Merit List मध्ये तुमचं नाव आणू शकता. यंदा संपूर्ण वर्ष शाळा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. पण कितीही अभ्यास झाला आहे असं म्हंटलं तरी एक विषय असतो ज्या विषयाचा अभ्यास कधीच झालेला नसतो. तो विषय म्हणजे ‘गणित’. गणिताचा अभ्यास म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा येतो. पण गणिताच्या भूमितीच्या पेपरचं संपूर्ण परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाचे प्रश्न माहिती असले की टेन्शन कमी होतं आज आम्ही तुम्हाला हीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Board Exam Tips: गणिताचा अभ्यास म्हणजे डोक्याला ताप; पण चिंता नको; बघा संपूर्ण पेपर पॅटर्न; एका क्लिकवर महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे गणिताचे दोन पेपर होणार आहेत. यामध्ये बीजगणित आणि भूमिती असे दोन वेगळे पेपर्स होणार आहेत. त्यापैकी गणिताचा दुसरा पेपर म्हणजेच भूमितीचा पेपर हा एकूण 40 मार्कांचा असणार आहे. तसंच पेपरचं टायमिंग 2 तासांचं असणार आहे.
गणिताच्या दुसऱ्या पेपरला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे आणि या पेपरमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत याबाबत वरील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.