JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Board Exam Tips: परीक्षांच्या काळात नक्की किती वेळ करावा अभ्यास? कसं करावं योग्य नियोजन? वाचा सविस्तर

Board Exam Tips: परीक्षांच्या काळात नक्की किती वेळ करावा अभ्यास? कसं करावं योग्य नियोजन? वाचा सविस्तर

आज आम्ही तुम्हाला अभ्यास नक्की किती वेळ करावा? (how many hours is perfect for study) आणि कशा पद्धतीनं करावा याबाबत माहिती देणार आहोत.

जाहिरात

पहाटे अभ्यास करण्यासाठी नक्की जाग येईल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च: राज्यात नुकतीच बारावीची बोर्डाची परीक्षा (Maharashtra state 12th Board Exams 2022) सुरु झाली आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये दहावी बोर्डाची परीक्षाही (Maharashtra state 10th board Exam 2022) सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासाला लागले आहेत. मात्र अनेकदा मुलं परीक्षेपेक्षा (Exam Study tips) अभ्यासाचंच अधिक टेन्शन (How to study for exams without tension) घेतात. टाइम टेबल तयार न केल्यामुळे विद्यार्थ्यांना तणाव येतो. दिवसभरातून अभ्यास नक्की किती वेळ करावा? (perfect way to do study) हे विद्यार्थ्यांना समजूच शकत नाही. जर हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अभ्यास नक्की किती वेळ करावा? (how many hours is perfect for study) आणि कशा पद्धतीनं करावा याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया वेळा काटेकोरपणे पाळा तुमचा वेळ टप्प्यांमध्ये वाटून घेतला की, तुमच्या अभ्यासाच्या वेळा काटेकोरपणे पाळा. अभ्यास करताना फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा. यावेळी टीव्हीवर काय चालू असेल किंवा कुटुंबातील व्यक्ती कोणाशी काय बोलत आहेत, याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तसंच अभ्यासाच्या वेळी तुमच्या जवळचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद करून ठेवा किंवा खोलीच्या बाहेर नेऊन ठेवा. परीक्षेच्या आधी Mock Test ठरू शकतात वरदान; चांगले मार्क्स मिळवण्यात होईल मदत सर्व विषयांचा अभ्यास करा बरेचदा अभ्यास करताना भरपूर वेळ निघून जातो; मात्र आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं समजण्यास अडचण होत असते. मात्र तरीही आपण तोच विषय वाचत असतो. असं करू नका. जर तुम्हाला कुठला विषय समजत नसेल; तर त्या विषयाच्या मागे तासंतास वाया घालवू नका. लगेच दुसरा विषय हाती घ्या, पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुम्हाला तासंतास अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. तसंच तुमचा वेळही वाया जाणार नाही. वेळेचं नियोजन करा अभ्यासाच्या वेळांचं नियोजन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील वेळेचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमची शाळा, ट्यूशन क्लासेस, खेळांचे क्लासेस यानंतर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे ते बघा. साधारणतः तुम्ही झोपतपर्यंत तुमच्याकडे 6 ते 8 तास शिल्लक असतात. यावेळेत अभ्यासाचं नियोजन करा. नियोजनातील काही वेळ इतर कामांसाठीही ठेवा. दिवसभरातील अभ्यासाचा वेळ वाटून घ्या सुटीच्या दिवशी शाळा, क्लासेस यापैकी काहीच नसतं. त्यामुळे तुम्ही संपूर्ण 24 तास घरीच असता. मात्र आपल्याला रोजपेक्षा अधिक वेळ मिळाला आहे म्हणून सलग  ते 8 तास अभ्यास करू नका. तुमचा दिवसभरातील संपूर्ण वेळ 2-2 तासांच्या टप्प्यांमध्ये वाटून घ्या. म्हणजेच अभ्यासाबरोबरच इतरही गोष्टींना वेळ द्या. सलग 2 तास अभ्यास करा, त्यानंतर खेळा किंवा टीव्ही बघा. यानंतर पुन्हा काही वेळानं अभ्यास करा. विद्यार्थ्यांनो, शिक्षण घेण्यासोबतच करा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी; लगेच मिळेल Job झोपून लवकर उठा अनेकांना अभ्यास करताना रात्रभर जागत बसण्याची सवय असते. रात्रीच्या शांततेच्या वातावरणात अभ्यास होतो, असेही अनेकजण सांगतात. मात्र हे तुमच्या प्रकृतीच्या दृष्टीनं घातक ठरू शकतं. त्यामुळे शक्य असल्यास रात्री 10 नंतर अभ्यास करू नका. त्यापेक्षा पहाटे लवकर उठून अभ्यास करा. पहाटेचा अभ्यास नेहमी लक्षात राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या