जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, Degree चं शिक्षण घेण्यासोबतच करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; लगेच मिळेल Job; वाचा सविस्तर

विद्यार्थ्यांनो, Degree चं शिक्षण घेण्यासोबतच करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; लगेच मिळेल Job; वाचा सविस्तर

3. स्टडी रूमचे दार पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावावे.

3. स्टडी रूमचे दार पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला लावावे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत (Tips to get Jobs easily) ज्या तुम्ही केल्यात तर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर नोकरी (How to get Job) मिळू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

**मुंबई, 08 मार्च:**आजकालच्या काळात फक्त डिग्रीपर्यन्त शिक्षण घेऊन जॉब (Jobs after Degree) मिळेलच असं नाही. यासाठी अनेकजण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीही (Post Graduation) करतात. मात्र पोस्ट ग्रॅज्युएशन सर्वांचं करणं शक्य नाही. डिग्रीनंतर लगेचच नोकरी मिळवायची (How to get jobs after degree) असेल तर काहीतरी मोलाचं करणं आवश्यक आहे. इतर विद्यार्थी करताहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत (Tips to get Jobs easily) ज्या तुम्ही केल्यात तर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर नोकरी (How to get Job) मिळू शकते. तसंच तुमच्या करिअरची सुरुवात लवकर होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया. प्राध्यापकांचं मार्गदर्शन घ्या शिक्षणानंतर लगेच जॉब मिळवायचा असेल तर आधीपासूनच CV आणि इतर सर्व गोष्टींसाठी तयार असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमचा सीव्ही सुधारायचा असेल, कव्हर लेटर लिहायचे असेल किंवा तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या करिअर पर्यायांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तुमच्या विद्यापीठातील प्रोफेसरशी बोला आणि करिअरच्या पर्यायांची चौकशी करा. अनेक विद्यापीठे तुम्हाला इंटर्नशिप किंवा प्लेसमेंट ऑफर करतात आणि त्यापूर्वी प्रशिक्षणासाठी अर्ज करतात. तुम्ही चांगल्या नोकऱ्यांसाठी प्लेसमेंटबद्दल चौकशी करू शकता. HR मुलाखतीदरम्यान विचारले जाऊ शकतात ‘हे’ प्रश्न; अशा पद्धतीनं द्या उत्तरं तज्ज्ञांच्या संपर्कात राहा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अनुभवी लोकांशी बोलणे आणि त्यांच्याकडून त्या क्षेत्राची माहिती घेणे सर्वात महत्त्वाचे असते. या क्षेत्रातील बहुतेक तज्ञ मार्गदर्शक सत्रात येतात, जे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात. व्यावसायिक लोकांचा सल्ला घेऊन करिअरमध्ये प्रगती करणे तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शक सत्रात, तुम्ही नोकरीसाठी अर्ज कसा करावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे शिकू शकता. Internship करणं महत्त्वाचं तुमचा सीव्ही अधिक चांगला आणि आकर्षक बनवण्यासाठी इंटर्नशिप खूप महत्त्वाची आहे. इंटर्नशिपमध्ये तुम्ही अनुभवी लोकांसोबत काम करता आणि नवीन गोष्टी शिकता. कामाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे सॉफ्ट स्किल्स विकसित करू शकता, जे तुम्हाला भविष्यातील करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल. करिअरमध्ये सतत पुढे जाण्यासाठी टॅलेंटच नाही तर ‘या’ गोष्टीही ठरतात फायदेशीर ऑनलाईन कोर्सेस ठरतील फायदेशीर तुमच्या सीव्हीमध्ये स्किल्स जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाइन कोर्स करू शकता. अनेक वेबसाइट्स विनामूल्य कोर्स ऑफर करतात, ज्यामध्ये तुम्ही स्किल्स विकसित करू शकता. कोर्स निवडण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील करिअरचे पर्याय पाहू शकता आणि त्यात आवश्यक स्किल्स असलेले कोर्स करू शकता. यामुळे तुम्हाला लगेच नोकरी मिळण्यात मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात