JOIN US
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! IIT कानपुर 'या' विद्यार्थ्यांना देणार वर्षाला तब्बल 3 लाख रुपये; मिळणार 10 स्पेशल स्कॉलरशिप्स

काय सांगता! IIT कानपुर 'या' विद्यार्थ्यांना देणार वर्षाला तब्बल 3 लाख रुपये; मिळणार 10 स्पेशल स्कॉलरशिप्स

काही विद्यार्थ्यांसाठी IIT कानपुरनं तब्बल 10 स्पेशल स्कॉलरशिप्स आणल्या आहेत. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना वर्षाला 3 लाख रुपये मिळणार आहेत. पण नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना?

जाहिरात

IIT कानपुर 'या' विद्यार्थ्यांना देणार वर्षाला तब्बल 3 लाख रुपये

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक JEE Advanced परीक्षेचा निकाल काही दिवसांआधीच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मिळालेल्या रँकिंगनुसार विद्यार्थ्यांना IIT कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र यामध्येही काही विद्यार्थ्यांसाठी IIT कानपुरनं तब्बल 10 स्पेशल स्कॉलरशिप्स आणल्या आहेत. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना वर्षाला 3 लाख रुपये मिळणार आहेत. पण नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध होणार आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. JEE Advanced 2023 मध्ये उत्कृष्ट क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IIT कानपूर JEE Advanced मध्ये टॉप 100 रँक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 शिष्यवृत्ती सुरू करणार आहे. या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क आणि निवास यासह सर्व खर्च भागवले जातील. ही शिष्यवृत्ती यूजीच्या चारही वर्षांसाठी दिली जाणार आहे. मात्र अशीही एक अट आहे की विद्यार्थ्याला वर्षाला किमान 8.0 CPI इतके मार्क्स घ्यावी लागतील. PMC Recruitment: तुम्हीही ग्रॅज्युएट आहात? टायपिंगही येतं? मग पुणे महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका; करा अप्लाय अहवालानुसार, IIT कानपूर अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देईल जे शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये B.Tech/BS प्रोग्राममध्ये प्रवेश घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयआयटी कानपूरने एका निवेदनात म्हंटलं आहे की, प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी तीन लाखांची शिष्यवृत्ती दिली जाईल. Railway Jobs: रेल्वेत नोकरी हवीये ना? मग असा अभ्यास कराल तर एका झटक्यात मिळेल सरकारी नोकरी आयआयटी कानपूरने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, एक पदवीधर विद्यार्थी त्याच्या चार वर्षांच्या बी.टेक/बीएस अभ्यासादरम्यान सुमारे 12 लाख रुपये खर्च करतो. या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क, निवास, वाहतूक, पुस्तके ते आरोग्य विम्यापर्यंत प्रत्येक बाबींची काळजी घेण्यात आल्याचं महाविद्यालयाचं म्हणणं आहे.

आयआयटी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी JOSAA काउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. 28 जूनपर्यंत अधिकृत वेबसाइट josaa.nic.in वर जाऊन विद्यार्थी समुपदेशनासाठी नोंदणी करू शकतात. आतापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी नोंदणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या