JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BHEL Recruitment: प्रोफेशनल्ससाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; पात्र असाल तर करा अप्लाय

BHEL Recruitment: प्रोफेशनल्ससाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी; पात्र असाल तर करा अप्लाय

या भरती प्रक्रियेत सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे.

जाहिरात

प्रोफेशनल्ससाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) मेडिकल प्रोफेशनल्सकडून विविध विषयांमध्ये पार्ट टाईम मेडिकल कन्सल्टंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. भेल रिक्रुटमेंट 2023 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड एका वर्षासाठी केली जाईल. समाधानकारक कामगिरी असल्यास कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेत सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे. यासंदर्भात ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिलंय. चिफ मेडिकल सर्व्हिसेसच्या निर्णयानुसार निवडलेल्या उमेदवारांना त्यांचे ड्युटी शेड्युल दिले जाईल. त्यानुसार दिवसात जास्तीत जास्त 6 तास काम करावं लागू शकतं. ही जाहिरात 14 जून 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पदांचे नाव व रिक्त जागा विविध विषयांमध्ये पार्ट टाइम मेडिकल कन्सल्टंट (PTMC- MBBS/Specialists) पदासाठी भरती केली जाणार आहे. या प्रक्रियेत सात रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये पीटीएमसी स्पेशलिस्ट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट पदासाठी एक, पीटीएमसी स्पेशलिस्ट गायनॅकॉजिस्ट पदासाठी एक, रेडियोलॉजिस्टसाठी एक, इंडस्ट्रिअल हेल्थ व सेफ्टीमध्ये एमबीबीएस झालेल्यांसाठी दोन आणि पीटीएमसी एमबीबीएस पदासाठी दोन अशा एकूण सात जागा भरल्या जातील. IIT New Course: देशातील या IIT कॉलेजेसनी लाँच केले ‘हे’ टॉप नवीन कोर्सेस; JEE च्या आधारे मिळेल प्रवेश पात्रता पीटीएमसी स्पेशलिस्ट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट यासाठी मान्यताप्राप्त इन्स्टिट्युटमधून उमेदवाराने ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये MD, MS, DNB in Ophthalmology किंवा डिप्लोमा केलेला असावा. पीटीएमसी स्पेशलिस्ट गायनॅकॉजिस्ट यासाठी मान्यताप्राप्त इन्स्टिट्युटमधून उमेदवाराने गायनॅकॉलॉजीमध्ये MD, MS, DNB in Gynecology, OBS, D.G.O शिक्षण पूर्ण केलेलं असावं. पीटीएमसी स्पेशलिस्ट (रेडियोलॉजिस्ट) यासाठी मान्यताप्राप्त इन्स्टिट्युटमधून उमेदवाराने रेडियॉलॉजीमध्ये MD, DNB RADIOLOGY, D.M.R.D शिक्षण पूर्ण केले असावे. या संदर्भातील इतर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर वाचू शकता. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करताय? मग राज्य सरकार करणार तुमचा पूर्ण खर्च; कसा? इथे मिळेल माहिती वयोमर्यादा इच्छुक आणि पात्र उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 01/06/2023 रोजी 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी. पगार दिवसात 2 ते 6 तासांदरम्यान कन्सल्टन्सी करावी लागेल त्यासाठी दर तासाला एमडी/डीएनबीला 660 रुपये, पीजी डिप्लोमा 570 रुपये, एमबीबीएस व एका वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना 440 रुपये दिले जातील. गायनॅकॉलॉजिस्टला कंपनीच्या नियमांनुसार जास्तीतजास्त 15 हजार रुपयांपर्यंत कॉल ड्युटी चार्जेस दिले जातील. अटी ‘प्री-मॅच्युअर रिटायरमेंट स्कीम’ अंतर्गत BHEL मधून निवृत्त झालेले उमेदवार BHEL च्या प्री-मॅच्युअर रिटायरमेंट पॉलिसीद्वारे गव्हर्न केले जातील. या पदांच्या मुलाखतीसाठी निवडले न गेलेल्या उमेदवारांसोबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. Maharashtra Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी 4644 जागांसाठी सर्वात मोठ्या पदभरतीची घोषणा; ही घ्या डायरेक्ट लिंक अर्ज कसा करायचा उमेदवार Part-Time Medical Consultants म्हणून BHEL च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात. योग्य रित्या भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे DGM/HR-EEX & RMX, HRM Dept., Ground Floor, Administrative Building, BHEL, RC Puram, Hyderabad, 502032 या पत्त्यावर पाठवावे लागतील. हा अर्ज 5 जुलै 2023 ला साडेचार वाजता किंवा त्याआधी पोहोचणं आवश्यक आहे. अर्जावर “Application for PTMC-Position Code No…” लिहिणं अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी या अर्जाची कागदपत्रांसह एक प्रत rmxhr@bhel.in या ईमेल आयडीवर पाठवावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या