बँक ऑफ बडोदा
नवी दिल्ली, 12 मे : आयटी क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 42 जागांसाठी नोकरभरती होते आहे. ही भरती आयटी विभागासाठी असेल. इच्छुक उमेदवार 29 मे 2023 पर्यंत या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ‘स्टडी कॅफे’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. बँक ऑफ बडोदाच्या आयटी विभागात करारपद्धतीनं नोकरभरती केली जाणार आहे. बँकेनं अधिकृत सूचनेद्वारे त्याबाबत माहिती दिली आहे. बँकेत 42 जागांसाठी ही भरती होणार आहे. हेही वाचा - रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी ‘या’ मंत्रालयात नोकरीची मोठी संधी; कसा कराल अप्लाय; इथे मिळेल लिंक सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड 2, क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअर 2, ज्युनिअर क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअर 2, सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा 14, डेव्हलपर-फुल स्टॅक जावा 6, डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा 6, सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट 2, डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट 6, सीनिअर UI/UX डिझायनर 1, UI/UX डिझायनर 1. वयोमर्यादा - सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड या पदासाठी कमीतकमी 28 तर जास्तीत जास्त 40 वर्षांची वयोमर्यादा आहे. - क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनीअर पदासाठी उमेदवारांचं कमीतकमी वय 25 वर्ष तर जास्तीत जास्त 35 वर्ष असावं. - ज्युनिअर क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी कमीतकमी 23 वर्षं तर जास्तीत जास्त वयोमर्यादा 30 वर्षं इतकी आहे. - सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा या पदासाठी उमेदवाराचं वय कमीतकमी 28 तर जास्तीत जास्त 40 वर्ष असावं. - डेव्हलपर-फुल स्टॅक जावा आणि डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा या पदांसाठी कमीतकमी वयोमर्यादा 25 वर्ष तर जास्तीत जास्त 35 वर्षं इतकी आहे. - सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या पदासाठी उमेदवाराचं कमीतकमी वय 28 वर्षं तर जास्तीत जास्त 40 वर्षं इतकं असावं. - डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या पदासाठी कमीतकमी 25 तर जास्तीत जास्त 35 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. - सीनिअर UI/UX डिझायनर या पदासाठी कमीतकमी 28 व जास्तीत जास्त 40 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. - UI/UX डिझायनर या पदासाठी कमीतकमी 25 तर जास्तीतजास्त 35 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. या पदांसाठी उमेदवारांकडे त्या त्या पदाचा अनुभव असावा लागेल. त्याबाबतही बँकेनं सूचनेमध्ये नमूद केलं आहे. - सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे 6 वर्षांचा अनुभव असावा. त्यापैकी 3 वर्षांचा अनुभव प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असावा. - क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. - ज्युनिअर क्वालिटी अॅश्युरन्स इंजिनिअर पदासाठी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. - सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा या पदासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. - डेव्हलपर-फुल स्टॅक जावा आणि डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे किमान 3 वर्षांचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला अनुभव असावा. - सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान 6 वर्षांचा अनुभव असावा. - डेव्हलपर-मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या पदासाठी किमान 3 वर्षांचा सॉफ्टवेअर टेस्टिंगचा अनुभव गरजेचा आहे. - सीनिअर UI/UX डिझायनर व UI/UX डिझायनर या पदांसाठी UI/UX डिझायनर रोल्समधील किमान 6 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. बँक ऑफ बडोदामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई. किंवा बी.टेक. झालेलं असावं. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 मे 2023 ही अंतिम तारीख आहे. आयटी क्षेत्रातलं शिक्षण व अनुभव असलेले इच्छुक उमेदवार बँकेकडे नोकरीसाठी अर्ज करू शकतात.