तुम्ही एखाद्या अशा गावाविषयी ऐकलंय का जिथे पाऊस पडत नाही. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र ही गोष्ट खरी आहे. आज अशाच एका गावाविषयी जाणून घेणार आहोत जिथे पाऊस पडत नाही.
येमेन हा अरबी द्विपकल्पाच्या नैऋत्य कोपऱ्यावर स्थित देश आहे. या देशाची राजधानी साना आहे. या शहरमध्ये हुताब नावाचे गाव आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही.
डोंगराच्या माथ्यावर बांधलेली घरे गावाच्या सौंदर्यात भर घालतात. आपल्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध असलेलं हे गाव पर्यटकांचं आकर्षक बनलं आहे.
हिताब गावातील लोकांना कधीच पावसाचा सामना करावा लागत नाही. हे अनोखं गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 3200 मीटर उंचीवर आहे.
या गावात पाऊस न पडण्याचे कारण म्हणजे हे गाव ढगांमध्ये वसलेलं आहे. अशा स्थितीत येथे तळाशी ढग तयार होतात आणि मग जमिनीवर पाऊस पडतो. या गावातील लोक खाली गेल्यावर कधीतरी पावसाचा सामना होतो.