JOIN US
मराठी बातम्या / करिअर / देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, SBIमध्ये 5000हून अधिक जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज?

देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, SBIमध्ये 5000हून अधिक जागांसाठी भरती; कुठे कराल अर्ज?

SBI लिपिक भरती परीक्षा 2022 नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेबाबत अधिक माहिती अधिसूचनेतून उपलब्ध होईल.

जाहिरात

SBI PO Recruitment

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 सप्टेंबर : बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लिपिक भरती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे SBI मध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट पदासाठी 5000 हून अधिक जागा रिक्त आहेत. SBI लिपिक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज उद्या 7 सप्टेंबर 2022 पासून SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर केले जातील. SBI लिपिक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 सप्टेंबर 2022 रोजी बंद होईल. अशा प्रकारे अर्ज भरण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक पदासाठी एकूण 5008 रिक्त जागा आहेत. महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, आणि उत्तर पूर्व येथे लिपिक पदासाठी भरती केली जाईल. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. यानंतर लखनौ आणि भोपाळमध्ये सर्वाधिक जागा आहेत.

Career Tips: ‘फॅशन लॉ’ म्हणजे नक्की काय? करिअरसोबत यात भरघोस पैसे कमावण्याची मिळते संधी; असं घ्या शिक्षण

संबंधित बातम्या

SBI लिपिक भरती परीक्षा नोव्हेंबरमध्ये

SBI लिपिक भरती परीक्षा 2022 नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेबाबत अधिक माहिती अधिसूचनेतून उपलब्ध होईल. SBI लिपिक भरती 2022 महत्वाच्या तारखा » SBI लिपिक भरती 2022 अधिसूचना – 6 सप्टेंबर 2022 » SBI लिपिक भरती 2022 अर्ज सुरू - 7 सप्टेंबर 2022 » SBI लिपिक भरती 2022 अर्जाची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2022 » SBI लिपिक भरती परीक्षा 2022- नोव्हेंबर 2022 » SBI लिपिक भरती परीक्षा प्रवेशपत्र - 29 ऑक्टोबर 2022 » एसबीआय लिपिक भरती मुख्य परीक्षा – डिसेंबर 2022/जानेवारी 2022 वाट बघून थकले विद्यार्थी; नक्की कधी जाहीर होणार NEET UG परीक्षेचा निकाल? SBI लिपिक भरती 2022 साठी पात्रता SBI लिपिक भरती 2022 साठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार 30 नोव्हेंबर 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेले असावेत. जे विद्यार्थी अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. त्यांची निवड झाल्यास, त्यांना 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. SBI लिपिक भरती 2022 साठी वयोमर्यादा SBI लिपिक भरती 2022 साठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या