JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NEET 2022: उमेदवारांनो, NEET परीक्षेसाठी अप्लिकेशन प्रोसेस झाली सुरू; फॉर्म भरण्याआधी वाचा 'हे' नियम

NEET 2022: उमेदवारांनो, NEET परीक्षेसाठी अप्लिकेशन प्रोसेस झाली सुरू; फॉर्म भरण्याआधी वाचा 'हे' नियम

या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू (Application process for NEET UG Exam 2022) करण्यात आली आहे

जाहिरात

चॉईस फायलिंग उद्या संपणार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 एप्रिल: पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात येणारी NEET परीक्षा (NEET UG Exam 2022) ही लवकरच घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू (Application process for NEET UG Exam 2022) करण्यात आली आहे. NEET UG 2022 अंतर्गत, MBBS, BDS, होमिओपॅथी, आयुष अभ्यासक्रम आणि B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो.. यानंतर NTA कडून ऑल इंडिया मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया घेण्यात येते. NEET UG परीक्षेचा निकाल (How to fil exam form for NEET 2022) जाहीर झाल्यानंतर, देशातील सरकारी वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील 15% अखिल भारतीय कोट्यातील जागा आणि डीम्ड विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांमधील जागा आणि राज्य कोट्यातील 85% सरकारी जागा आणि सर्व खाजगी जागांसाठी काउन्सिलिंग वेगळं होणार आहे. NEET Exam 2022: विद्यार्थी नक्की का करताहेत NEET 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल उत्तर असा भरा NEET परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म NEET परीक्षा केंद्र वाटप प्रक्रिया पूर्णपणे कम्प्युटर बेस्ड असणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना घाई करू नका. फॉर्म (Application filling for NEET 2022) भरून देखील सबमिट केला जाऊ शकतो. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वीचे गुण, रोल नंबर आणि शाळेची माहिती काळजीपूर्वक भरा. ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर, पुष्टीकरण पृष्ठाच्या पाच प्रती तुमच्याकडे ठेवा असा सल्ला देण्यात आला आहे. तसंच जे विद्यार्थी 2022 मध्ये 12वीच्या परीक्षेला बसले आहेत. त्यांना कोड-01 भरावा लागेल. 1 जानेवारी 2022 नंतर पांढऱ्या बॅकग्राउंडवर काढलेला एक पासपोर्ट आकार आणि एक पोस्टकार्ड आकाराचा रंगीत फोटो jpeg फॉरमॅटमध्ये ऑनलाइन अपलोड करावा लागेल. विद्यार्थ्याने त्याचे नाव आणि फोटो काढण्याच्या तारखेसह छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांच्या आठ प्रती आणि पोस्टकार्ड आकाराच्या छायाचित्रांच्या चार प्रती आपल्याजवळ ठेवाव्या लागतील. फोटोवर नाव आणि तारीख आणि चेहरा 80 टक्के दृश्यमानतेसह असावा. त्याचबरोबर पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने सही करावी लागते. स्वाक्षरी ऐवजी मोठ्या अक्षरात नाव लिहिल्याने चालणार नाही. अर्ज भरताना डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांच्या अंगठ्याचा ठसा फक्त jpeg फॉरमॅटमध्ये अपलोड करावा लागेल. NEET UG Exam 2022: विद्यार्थ्यांनो 200 मिनिटांमध्ये 200 प्रश्नांची द्या उत्तरं; असं असेल Exam Pattern Physics चाही करा अभ्यास Physics हा एकमेव पात्रता विभाग मानावा आणि त्याचा स्कोअर NEET गुणवत्ता यादीमध्ये वापरू नये यासाठी काही शिक्षकांनी वैयक्तिक सूचना केल्या होत्या. मात्र NEET 2022 मधून भौतिकशास्त्र काढलेले नाही. तसंच NTA ने NEET मध्ये असे कोणतेही बदल केलेले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या