जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NEET UG Exam 2022: विद्यार्थ्यांनो 200 मिनिटांमध्ये 200 प्रश्नांची द्या उत्तरं; असं असेल Exam Pattern

NEET UG Exam 2022: विद्यार्थ्यांनो 200 मिनिटांमध्ये 200 प्रश्नांची द्या उत्तरं; असं असेल Exam Pattern

समोर आली लेटेस्ट अपडेट

समोर आली लेटेस्ट अपडेट

आता NEET परीक्षेच्या काही नियमांमध्ये आणि परीक्षेच्या पॅटर्नमध्ये (NEET UG Exam Pattern 2022) बदल करण्यात आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल: बारावीनंतर NEET ही प्रवेश परीक्षा (NEET Entrance Exam 2022) देऊन MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांचं असतं. यासाठीच लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी (NEET Exam Preparation 2022) करत असतात. देशभरातील वैद्यकीय संस्थांच्या UG अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET UG परीक्षा (NEET UG Exam 2022) सर्वात आधी द्यावी लागते. दरवर्षी ही परीक्षा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (National Testing Agency) घेतली जाते. यावर्षी NEET 2022 ची परीक्षा 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. मात्र त्याआधी आता NEET परीक्षेच्या काही नियमांमध्ये आणि परीक्षेच्या पॅटर्नमध्ये (NEET UG Exam Pattern 2022) बदल करण्यात आले आहेत. मोठी बातमी : देशभरातील Engineering, Management महाविद्यालयांमध्ये एकसमान Fee Structure तुम्ही NEET परीक्षेसाठी 6 मे 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर अर्ज करू शकता. जर तुम्ही NEET 2022 UG परीक्षेला बसणार असाल, तर तुम्हाला त्याची परीक्षा पॅटर्न (NEET UG Exam Pattern) देखील माहित असणे आवश्यक आहे. हे तुम्हाला परीक्षेची चांगली तयारी करण्यास मदत करेल. NEET UG परीक्षेद्वारे, AIIMS (वैद्यकीय अभ्यासक्रम) सह देशातील सर्व वैद्यकीय, डेंटल, आयुष आणि निवडक B.Sc नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. चला तर समजून घेउया NEET परीक्षेचा नवीन पॅटर्न. 200 मिनिटांमध्ये 200 प्रश्न NEET UG 2022 परीक्षेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) विषयांमधून 200 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयातील 50 प्रश्न दोन विभागांमध्ये विभागले जातील म्हणजे A आणि B. NEET परीक्षेचा कालावधी 200 मिनिटे म्हणजेच 3.20 तासांचा असेल. दुपारी 2 ते 5.20 या वेळेत परीक्षा होणार आहे. Study Abroad: परदेशात शिक्षणाला जाताना बॅगमध्ये नक्की ठेवा ‘या’ गोष्टी; अन्यथा..

निगेटिव्ह मार्किंगसाठी रहा तयार

NEET परीक्षेतील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. उमेदवाराने प्रयत्न करण्याऐवजी प्रश्न सोडल्यास कोणतेही चिन्ह वजा केले जाणार नाही. NEET परीक्षा इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १२ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात