मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET Exam 2022: विद्यार्थी नक्की का करताहेत NEET 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल उत्तर

NEET Exam 2022: विद्यार्थी नक्की का करताहेत NEET 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल उत्तर

समोर आली लेटेस्ट अपडेट

समोर आली लेटेस्ट अपडेट

NEET 2022 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय इच्छुक का पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत ते सविस्तर जाणून घ्या.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 11 एप्रिल: नॅशनल एलिजिबिलिटी (National Eligibility) आणि एंट्रन्स परीक्षा 2022 (Entrance Exam 2022) शी संबंधित हॅशटॅग सोशल मीडियावर (Social Media Hashtags) ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा (NEET Exam 2022) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवर #PostponeNEETUG2022 ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेसाठी (Why NEET Exam tags is trending on Twitter) विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 (NEET Exam 2022 date) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे.

NTA च्या अधिसूचनेनुसार, NEET UG 17 जुलै 2022 रोजी ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येईल. NEET पुढे ढकलण्यासाठी NTA किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET 2022 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय इच्छुक का पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत ते सविस्तर जाणून घ्या.

सुवर्णसंधी! भारतीय इम्पोर्ट-एक्स्पोर्ट बँकेत होणार मोठी पदभरती; करा अर्ज

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गेल्या आठवड्यातच NEET UG 2022 परीक्षा आयोजित करण्याची तारीख जाहीर केली होती. NTA च्या घोषणेनुसार, परीक्षा 17 जुलै रोजी होणार आहे आणि अर्ज नोंदणी प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.

मात्र, परीक्षेच्या जाहीर झालेल्या तारखेबाबत अनेक उमेदवारांचे आक्षेप आहेत. परीक्षेची अधिसूचना जाहीर होणे आणि परीक्षेची तारीख यात अवघे दोन महिन्यांचे अंतर असल्याचे सांगत अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. एवढा वेळ तयारीसाठी खूप कमी आहे. त्यामुळे, विद्यार्थी आता अधिकाऱ्यांकडे NEET UG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.

विद्यार्थ्यांची कारणं

इतकेच नाही तर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की एनटीएने आधीच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पुढे ढकलली आहे. तसेच, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जेईई मेनसाठी दोन संधी आहेत. दुसरीकडे NTA NEET विद्यार्थ्यांना फक्त एकच संधी देत ​​आहे आणि त्यासाठी फक्त दोन महिन्यांचा वेळ दिला जात आहे.

तुम्हीही बँकेच्या परीक्षांची तयारी करताय? मग अशी करा विविध विषयांची तयारी; वाचा

त्यादरम्यान CBSE परीक्षा, CUET आणि JEE या महत्त्वाच्या परीक्षाही होणार आहेत. अशा परिस्थितीत, NEET UG साठी चांगली तयारी करणे कठीण आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षेत बसण्याची एकच संधी असल्याने NEET UG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

First published:

Tags: CBSE 12th, Entrance Exams, Exam Fever 2022, Medical exams, Twitter